IPL 2021: "CSK म्हाताऱ्यांचा संघ" म्हणणाऱ्यांना कोचचं सडेतोड उत्तर! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CSK-Team-Coach-Reaction

चेन्नईने कोलकाताला पराभूत करत पटकावलं IPL विजेतेपद

"CSK म्हाताऱ्यांचा संघ" म्हणणाऱ्यांना कोचचं सडेतोड उत्तर!

sakal_logo
By
विराज भागवत

IPL 2021 FINAL मध्ये CSK च्या संघाने KKR ला पराभूत करून विजेतेपदाचा चौकार लगावला. सलामीवीर फाफ डू प्लेसिसच्या तडाखेबाज ८६ धावांच्या खेळीच्या जोरावर CSK ने प्रथम फलंदाजी केली आणि २० षटकात ३ बाद १९२ धावांपर्यंत मजल मारली. हे आव्हान KKR च्या फलंदाजांना पार करता आलं नाही. कोलकाताच्या सलामीवीर व्यंकटेश अय्यर (५०) आणि शुबमन गिल (५१) यांनी संघाला भक्कम सलामी दिली होती. पण इतर फलंदाजांनी त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले. त्यामुळे CSK चा २७ धावांनी विजय झाला. चेन्नईने एकूण १० वेळा फायनलमध्ये धडक देत चौथ्यांदा विजेतेपद मिळवलं. याबद्दल त्यांचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी मत व्यक्त केलं.

हेही वाचा: IPL 2021: चेन्नईच 'सुपर किंग'; CSKचा विजेतेपदाचा चौकार!

"आम्ही IPL मध्ये अनेक वेळा फायनल्स खेळलो आहोत. पण अंतिम सामना जिंकण्याचे आव्हान खूप मोठं असतं. आमच्या संघातील अनेक खेळाडूंच्या वयावरून टीका केली जाते. पण आम्ही विजेतेपद मिळवून दाखवलं. मोठ्या स्पर्धांमध्ये अनुभव महत्त्वाचा असतो. दडपणाचे अनेक प्रसंग अनुभवी खेळाडूंनी पाहिलेले असतात. त्याचा अशा बड्या सामन्यांमध्ये फायदा होतो", असं सडेतोड उत्तर कोच फ्लेमिंगने दिलं.

हेही वाचा: IPL FINAL: कार्तिकने डू प्लेसिसला दिलेलं जीवदान KKRला पडलं भारी

"आम्ही आकडेवारी आणि टीका टिप्पणीकडे फारसं लक्ष देत नाही. आमच्या संघातील बहुतेक लोक मनाला जे योग्य वाटतं ते करतात. आधुनिक जगात या गोष्टींना फारसं महत्त्व दिलं जात नाही हे मला माहित्ये पण आमच्या संघाला याचा नक्की फायदा होतो आणि ते वेळोवेळी सिद्ध झालंय. आम्ही गेले कित्येक वर्षे एकत्र खेळतो आहोत. या वर्षांमध्ये आम्ही एकमेकांनी नीट समजून घेतलं आहे. त्यामुळे आमच्या काही खास आठवणीही तयार झाल्या आहेत. मी या संघासोबत आहे याचा मला अभिमान आहे", असे फ्लेमिंग म्हणाला.

loading image
go to top