esakal | IPL 2021 : व्वा ऋतूराज! शेवटच्या चेंडूवर षटकार खेचून साजरं केल शतक
sakal

बोलून बातमी शोधा

Ruturaj Gaikwad

व्वा ऋतूराज! शेवटच्या चेंडूवर षटकार खेचून साजरं केल शतक

sakal_logo
By
सुशांत जाधव

Ruturaj Gaikwad Maiden Century : चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर ऋतूराज गायकवाडनं आयपीएलच्या कारकिर्दीतील आपले पहिले वहिले शतक साजरं केल. राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या या शतकी कामगिरीसह त्याने यंदाच्या हंगामात 500 धावांचा टप्पा पार करत ऑरेंज कॅपवरही कब्जा केला आहे. युएईच्या मैदानात मागील वर्षी झालेल्या आयपीएलच्या हंगामात ऋतूराजने अखेरच्या टप्प्यात जबरदस्त कामगिरी करुन सर्वांचे लक्ष वेधले होते. 6 सामन्यात 3 अर्धशतकासह 204 धावा करुन त्याने चेन्नईला नवा हिरो मिळाल्याचे संकेत दिले.

यंदाच्या हंगामात त्याने गत हंगामातील फॉर्म पुढे नेला. 12 सामन्यात त्याने 500 + धावा करुन सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वलस्थान पटकावले आहे. पंजाब किंग्जचा कर्णधार लोकेश राहुलला मागे टाकत त्याने आता ऑरेंज कॅपवर कब्जा केला आहे. अखेरच्या षटकात जाडेजा उत्तुंग फटकेबाजी करत होता. त्यामुळे ऋतूराज पहिल्या शतकापासून दूर राहतोय का? असा प्रश्न सामना पाहणाऱ्या प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला होता.

हेही वाचा: IPL 2021: "म्हणून आम्ही हारलो"; हिटमॅनने दिली प्रामाणिक कबुली

मुश्तफिझुर रहमानच्या अखेरच्या षटकातील चार चेंडूनंतर जाडेजाने ऋतूराजला स्ट्राइक दिले. शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या ऋतूराजला त्याने कमालीचा बाउन्सर मारत पाचवा चेंडू निर्धाव टाकला. त्यानंतर अखेरच्या चेंडूवर ऋतूराजने षटकार खेचून पहिलं वहिलं शतक साजरं केलं. ऋतूराजने आपल्या 60 चेंडूत 9 चौकार आणि 5 षटकाराच्या मदतीने नाबाद 101 धावा केल्या.

loading image
go to top