esakal | IPL Record : IPL Record : बुमराह, मलिंगाला टाकलं मागे; ब्रावोचा विक्रमही हर्षलच्या टप्प्यात|Harshal Patel
sakal

बोलून बातमी शोधा

Harshal Patel

बुमराह, मलिंगाला टाकलं मागे; ब्रावोचा विक्रमही हर्षलच्या टप्प्यात

sakal_logo
By
सुशांत जाधव

सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा जलदगती गोलंदाज हर्षल पटेलनं पुन्हा एकदा तीन विकेट घेतल्या. यंदाच्या हंगामात हॅटट्रिक नोंदवणाऱ्या पटेलच्या खात्यात आता 29 विकेट्सची नोंद झालीये. या कामगिरीसह आयपीएलच्या इतिहासात एका हंगामात सर्वाधिक विकेट घेणारा तो भारतीय गोलंदाजही ठरला आहे. जसप्रीत बुमराहला मागे टाकत त्याने हा विक्रम आपल्या नावे केला. युएईमध्ये झालेल्या मागील हंगामात जसप्रीत बुमराहनं 27 विकेट घेतल्या होत्या.

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम हा सध्याच्या घडीला चेन्नईच्या ताफ्यातून खेळणाऱ्या कॅरेबियन अष्टपैलू ड्वेन ब्रावोच्या नावे आहे. त्याने 2013 च्या हंगामात 32 विकेट घेतल्या होत्या. सात हंगामानंतरही हा विक्रम आबाधित आहे. हा विक्रम मोडण्याची संधी हर्षल पटेलकडे आहे. यासाठी त्याला केवळ 4 विकेट्सची आवश्यकता आहे. बंगळुरुच्या संघाचा साखळी सामन्यातील आणखी एक सामना बाकी असून प्ले ऑफमध्येही बंगळुरु खेळणार आहे. त्यामुळे हर्षल पटेलसाठी ही सुवर्ण संधीच आहे.

हेही वाचा: Video : हर्षलचा जबरदस्त इनस्विंग; केनच्या उडवल्या दांड्या

एका हंगामात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत ड्वेन ब्रावोच्या पाठोपाठ कगिसो रबाडाचा नंबर लागतो. मागील हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या या गोलंदाजाने 30 विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर तिसरा क्रमांकावर हर्षल पटेलचा नंबर लागतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या यॉर्कर स्पेशलिस्टच्या नावे एका हंगामात 28 विकेटची नोंद आहे. 2011 च्या हंगामात त्याने ही कामगिरी केली होती. त्यालाही हर्षल पटेलनं मागे टाकले आहे.

हेही वाचा: Video : 'क्या बात ये' धनश्रीच्या नादानं युजी परफेक्ट स्टेप्स शिकला की...

loading image
go to top