esakal | IPL 2021: हर्षल पटेलनं रचला इतिहास, चहलचा रेकॉर्ड मोडत बनला टॉपर
sakal

बोलून बातमी शोधा

Harshal Patel

IPL Record : हर्षल पटेलच्या नावे नवा विक्रम

sakal_logo
By
सुशांत जाधव

IPL 2021: यंदाच्या आयपीएल हंगमात हॅटट्रिकचा पराक्रम नोंदवणाऱ्या हर्षल पटेलनं (Harshal Patel) राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात एका षटकात 3 विकेट घेतल्या. या कामगिरीसह त्याने खास विक्रम आपल्या नावे नोंदवला. आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून एका हंगामात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो अव्वलस्थानी विराजमान झालाय. त्याने फिरकीपटू युजवेंद्र चहलला मागे टाकत नवा विक्रम प्रस्थापित केला. चहलने 2015 च्या हंगामात 23 विकेट घेतल्या होत्या. आयपीएलच्या इतिहासात एका हंगामात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम हा ड्वेन ब्रावोच्या नावे आहे. ब्रावोने एका हंगामात 32 विकेट घेतल्या आहेत.

राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात हर्षल पटेल पुन्हा एकदा हॅटट्रिकच्या उंबरठ्यावर पोहचला होता. रियान पराग, क्रिस मॉरिस यांना त्याने पाठोपाठ बाद केले. हंगामात दुसरी हॅटट्रिक नोंदवण्याची संधी हुकल्यानंतर याच षटकात त्याने चेतन सकारियाला बाद केले. राजस्थान रॉयल्सने 11 षटकातच धावफलकावर 100 धावा लावल्या होत्या. अखेरच्या 9 षटकात राजस्थानला केवळ 49 धावा करता आल्या. यादरम्यान त्यांनी तब्बल 8 विकेट गमावल्या.

हेही वाचा: IPL 2021 : अश्विन हे वागणं बरं नव्हे; शेन वॉर्नची तिखट प्रतिक्रिया

RCB साठी IPL मध्ये एका हंगामात सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज

26 - हर्षल पटेल, 2021*

23 - युजवेंद्र चहल, 2015

23 - आर विनय कुमार, 2013

हेही वाचा: IPL 2021: अर्जुन तेंडुलकर एकही सामना न खेळताच भारतात परतणार

एविन लुईस 37 चेंडूत 58 धावा आणि यशस्वी जायसवाल 22 चेंडूत 31 धावा करुन परतल्यानंतर एकाही फलंदाजाला मैदानात तग धरता आला नाही. हर्षल पटेलसह शहाबाज अहमद आणि चहलने प्रत्येकी दोन-दोन विकेट घेतल्या.

loading image
go to top