esakal | KKR ला मिळाला नवा ओपनर; नावे 198 धावांचा धमाकेदार रेकॉर्ड
sakal

बोलून बातमी शोधा

Venkatesh Iyer

KKR ला मिळाला नवा ओपनर; नावे 198 धावांचा धमाकेदार रेकॉर्ड

sakal_logo
By
सुशांत जाधव

IPL 2021 New Hero For KKR : इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाकडून दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सामन्या आणखी एक मोठा बदल पाहायला मिळाला. नियमित सलामीवीर शुभमन गिलच्या साथीला नवा भिडू दिसला. अष्टपैलू व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) ने आयपीएलच्या पहिल्या सामन्यात नाबाद 42 धावांची खेळी केली.

प्ले ऑफमधील आपले स्थान कायम ठेवण्यासाठी कोलकातासाठी हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धचा सामना जिंकणे महत्त्वाचे होते. पहिल्यांदा गोलंदाजांनी तगडी बॅटिंग लाइनअप असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे कंबरडे मोडले. त्यानंतर अल्प धावसंख्येचा पाठलाग करताना शुभमन गिल आणि व्यंकटेश अय्यरने आरसीबीच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. या जोडीने पावर प्लेमध्येच संघाच्या धावफलकावर 50 धावा लावल्या. पहिल्या विकेटसाठी दोघांनी 82 धावांची भागीदारी केली. शुभमन गिल अर्धशतकाच्या उंबरठ्यावर बाद झाला. त्याचे अर्धशतक अवघ्या 2 धावांनी हुकले.

हेही वाचा: IPL 2021: KKR नं RCB ची झोप उडवून गाजवली रात्र!

त्यानंतर मध्यप्रदेशच्या 26 वर्षीय अष्टपैलून सामन्याला फिनिशिंग टच दिला. डावातील दहाव्या षटकातील चहलच्या अखेरच्या चेंडूवर व्यंकटेशनं खणखणीत चौकार खेचला. या चौकारासह कोलकाता नाईट रायडर्सने 9 गडी आणि 10 षटके राखून सामना खिशात टाकला.

व्यंकटेश अय्यरची कामगिरी

डावखुऱ्या व्यंकटेशनं 38 टी-20 सामन्यात 26 च्या सरासरीने 21 विकेट घेतल्या आहेत. इकोनॉमी 7 पेक्षा कमी आहे. फलंदाजीतही त्याने 36 च्या सरासरीने 724 धावा केल्या आहेत. यात दोन अर्धशतकाचा समावेश आहे. 10 प्रथम श्रेणीत त्याने 545 धावा तर 7 विकेट त्याच्या नावे आहेत. 24 लिस्ट ए सामन्यात 849 धावा, 10 विकेट अशी लक्षवेधी कामगिरी त्याने करुन दाखवली आहे.

हेही वाचा: Video : आंद्रे रसेलनं घेतला बदला; AB च्या नावे नकोसा विक्रम

याच वर्षी फ्रेब्रुवारीमध्ये मध्यप्रदेशच्या डावाची सुरुवात करताना त्याने पंजाब विरुद्ध 198 धावांची धमाकेदार खेळी केली होती. लिस्ट ए स्पर्धेतील विजय हजारे ट्रॉफीत त्याने ही धमाकेदार खेळी केली होती. त्याच्या खेळीत 20 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता. यातील 122 धावा त्याने चौकाराच्या मदतीने केल्या होत्या.

loading image
go to top