Video: पंतने झपकन फिरवली बॅट अन्... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video: कार्तिक मागे असतानाच पंतने झपकन फिरवली बॅट अन्...

Video: कार्तिक मागे असतानाच पंतने झपकन फिरवली बॅट अन्...

IPL 2021 : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स संघाने दमदार कामगिरी करुन प्ले ऑफचे तिकीट निश्चित केले आहे. गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असलेला दिल्ली कॅपिटल्सचा संघ कोलकाता विरुद्धच्या सामन्यात थोडा बॅकपूटवर दिसला. कोलकाताच्या गोलंदाजांनी सुरेख मारा करत दिल्लीच्या आघाडीच्या फलंदाजांना स्वस्तात आटोपले. संकटात सापडलेल्या संघाला बाहेर काढण्यासाठी पंतने 39 धावांची उपयुक्त खेळी केली. अखेरच्या षटकात दुहेरी धाव घेताना तो धावबाद झाला.

आपल्या आक्रमक फलंदाजीवेळी तो ताकदीने फटके मारताना पाहायला मिळते. कोलकाता विरुद्धच्या सामन्यात त्याने असे काही केले की दिनेश कार्तिकला काहीवेळासाठी दिवसा तारे दिसले असतील. शारजहाच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात 17 व्या षटकात वरुण चक्रवर्ती गोलंदाजीला आला. त्याच्या पहिल्या चेंडूवर पंतने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण तो अपयशी ठरला.

हेही वाचा: IPL स्पॉट फिक्सिंग...10 लाख; श्रीशांतने केले धक्कादायक खुलासे

चेंडू पॅडला लागून यष्टीच्या दिशेने जातोय असे पंतला वाटले. या नादात त्याने विकेट वाचवण्यासाठी चेंडू स्टम्पपासून दूर नेण्यासाठी जोरात बॅट फिरवली. विकेट मागे असलेल्या दिनेश कार्तिकला बॅट जणू लागते की काय असे चित्र थोड्या वेळासाठी निर्माण झाले. या घटनेनंतर पंतने दिनेश कार्तिकची माफी मागितल्याचेही पाहायला मिळाले.

हेही वाचा: IPL 2021, Orange Cap Race : संजूनं गब्बरला टाकलं मागे

इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील कोलकाताच्या दृष्टीने हा सामना महत्त्वपूर्ण आहे. प्ले ऑफमधील स्थान कायम राखण्यासाठी त्यांना कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकावा लागले. कोलकाता संघाने दिल्ली कॅपिटल्सला अवघ्या 127 धावा रोखले. दिल्ली कॅपिटल्सकडून पंत आणि अय्यरने प्रत्येकी 39-39 धावा केल्या. या दोघांशिवाय शिखर धवनने 24 धावांची खेळी केली.

loading image
go to top