esakal | IPL Points Table : हैदराबादनं बंगळुरुच्या 'विराट' स्वप्नाला लावला सुरुंग
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli

IPL 2021 Points Table : SRH नं कोहलीच्या RCB चं गणित बिघडवलं

sakal_logo
By
सुशांत जाधव

IPL 2021 Latest Points Table : स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले तरी शेवटच्या सामन्यापर्यंत कडवी झुंज देण्याची क्षमता असल्याचे सनरायझर्सं हैदराबादनं दाखवून दिलं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या सामन्यातील अस्तित्वाची लढाई त्यांनी जिंकली. या विजयानं मिळालेल्या दोन गुणामुंळे हैदराबादला काहीच फायदा होणार नसला तरी दोन गुण गमावल्यामुळे बंगळुरुच्या संघाला मोठा तोटा झाला आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत नंबर दोनपर्यंत पोहचण्याचे त्यांचे स्वप्न भंगले आहे.

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात प्रत्येकी संघाचे 13 सामने झाले आहेत. दिल्ली कॅपिटल्सचा संघ 10 विजय आणि 3 पराभवासह 20 गुण मिळवत अव्वलस्थानावर आहे. चेन्नई सुपर किंग्जने 13 पैकी 9 सामने जिंकून 18 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. प्ले ऑफमध्ये स्थान पक्के केल्यानंतर टॉप 2 मध्ये पोहचण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध विजय महत्त्वाचा होता. जे संघ पहिल्या दोनमध्ये असतात त्यांना फायनलमध्ये पोहचण्याची एक्स्ट्रा संधी असते. तिच मिळवण्याचा बंगळुरुचा प्रयत्न होता. पण आता त्यांना दोनवर पोहचता येणार नाही. उरलेला एक सामना जिंकून त्यांना 18 गुणापर्यंतच मजल मारता येईल. चेन्नईचे रनरेट त्यांच्यापेक्षा भारी असल्यामुळे या परिस्थितीतही ते तिसऱ्या स्थानावरच राहतील.

हेही वाचा: RCB vs SRH भुवीनं एबीला रोखलं अन् कोहलीसमोर पुन्हा विल्यमसन जिंकला!

प्ले ऑफमधील चौथ्या स्थानासाठी उद्याच्या डबल हेडरमधील एक सामना महत्त्वाचा आहे. कोलकाता नाईट रायडर्स 13 पैकी 6 विजयासह 12 गुण मिळवून चौथ्या स्थानावर आहे. दोन गुण मिळवून स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी ते राजस्थान रॉयल्स विरुद्ध भिडणार आहेत. हा निकाल पाचव्या क्रमांकावर असलेल्या मुबंई इंडियन्ससाठी महत्त्वाचा असेल. मुंबईच्या खात्यातही 13 सामन्यानंतर 6 विजयासह 12 गुण आहेत.

हेही वाचा: Video : अन् अंपायर कॉलनं घेतली विराटची विकेट

पंजाब किंग्ज 13 पैकी 5 विजयासह 10 गुणांसह सहाव्या तर राजस्थान रॉयल्सचा संघ 13 पैकी 5 विजयासह 10 गुणांसह सातव्या स्थानावर आहे. गुणतालिकेत तळाला असलेल्या सनरायझर्स हैदराबादने 13 पैकी 3 सामन्यातील विजयासह 6 गुण जमा केले आहेत.

loading image
go to top