IPL 2021: T20 क्रिकेटमध्ये पोलार्डचा लॉर्ड विक्रम!

फलंदाजी आणि गोलंदाजीत खास कामगिरी नोंदवणारा पोलार्ड क्रिकेट जगतातील एकमेव खेळाडू आहे.
Kieron Pollard
Kieron Pollard

MI vs PBKS: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) च्या ताफ्यातील केरॉन पोलार्डने (Kieron Pollard) पंजाब विरुद्धच्या सामन्यात खास विक्रम आपल्या नावे केला. पंजाब किंग्जचा कर्णधार लोकेश राहुलला बाद करत पोलार्डने टी-20 क्रिकेट (T20 Cricket) मध्ये 300 गडी बाद करण्याचा टप्पा पार केला. टी-20 क्रिकेटमध्ये 10 हजारपेक्षा अधिक धावा आणि 300 विकेट असा पराक्रम करणारा पोलार्ड क्रिकेट जगतातील एकमेव खेळाडू आहे.

पोलार्डने पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात दोन विकेट घेत पंजाबला बॅकफूटवर ढकलले. या दोन विकेटसह त्याने टी-20 कारकिर्दीत 300 विकेटचा पल्ला गाठला. पंजाब विरुद्ध बॅटिंगला उतरण्यापूर्वी त्याच्या खात्यात 11202 धावांची नोंद आहे. टी-20 क्रिकेट कारकिर्दीत आतापर्यंत 5 खेळाडूंनी 10 हजार धावांचा पल्ला पार केला आहे. तर 11 खेळाडूंनी 300 विकेट घेतल्या आहेत. यात पोलार्ड एकमेव असा खेळाडू आहे ज्याने 10000 + धावा आणि 300 विकेट घेतल्या आहेत. हा एक विश्वविक्रमच असून तो मागे टाकणे सहज शक्य नाही.

Kieron Pollard
IPL 2021 Video: KKRचा दिल्लीवर विजय; सुनील नारायण सामनावीर

टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पोलार्ड दुसऱ्या क्रमांकावर आहे. कॅरेबियन स्फोटक फलंदाज ख्रिस गेल या यादीत अव्वलस्थानी आहे. गेलने टी-20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत 14275 धावा कुटल्या आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम हा देखील वेस्ट इंडिजच्या खेळाडूच्या नावे आहे. ड्वेन ब्रावोनं 546 विकेट घेतल्या आहेत. त्याच्या खात्यात 6597 धावांचीही नोंद आहे.

Kieron Pollard
Video : मुंबईकराची खिलाडूवृत्ती! राहुलला आधी आउट केलं अन् खेळ म्हणाला...

पंजाब विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पोलार्डसह बुमराहच्या दोन विकेट आणि राहुल चाहर आणि क्रुणाल पांड्याने घेतलेली प्रत्येकी एक-एक विकेटच्या जोरावर मुंबईने पंजाबला 135 धावांवर रोखले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com