IPL2021 : बडे दिलवाला धोनी! KKRच्या संघाचंही केलं कौतुक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बडे दिलवाला धोनी! KKRच्या संघाचंही केलं कौतुक

धोनीने चेन्नईच्या संघाचे कौतुक करताना केकेआरच्या संघावरसुद्धा स्तुतीसुमने उधळली.

बडे दिलवाला धोनी! KKRच्या संघाचंही केलं कौतुक

sakal_logo
By
टीम ई सकाळ

आयपीएल २०२१ च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाइट रायडर्सचा २७ धावांनी पराभव केला. या विजयासह चेन्नईने चौथ्यांदा आयपीएलच्या विजेतेपदावर नाव कोरले. चेन्नईच्या संघाने आतापर्यंत १३ वर्षात नऊ वेळा फायनलमध्ये धडक मारली आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने २०१०, २०११, २०१८ आणि आता २०१२ मध्ये विजेतेपद पटकावलं.

चेन्नईने दुबईत झालेल्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना तीन बाद १९२ धावा केल्या. त्यानंतर मैदानात उतरलेल्या कोलकाता नाइट रायडर्सला १६५ धावात रोखलं आणि २७ धावांनी विजय मिळवला. या विजयासह चेन्नईने २०१२ च्या अंतिम सामन्यात कोलकाताकडून झालेल्या पराभवाची परतफेडसुद्धा केली.

हेही वाचा: "मी पुन्हा येईन"; धोनीचं हर्षा भोगलेंना दमदार उत्तर

विजयानंतर बोलताना धोनीने चेन्नईच्या संघाचे कौतुक करताना केकेआरच्या संघावरसुद्धा स्तुतीसुमने उधळली. धोनी म्हणाला की, सीएसकेबद्दल बोलण्याआधी केकेआरबद्दल मी बोलेन. केकेआरचा संघ ज्या स्थितीत होता तिथून अंतिम फेरी गाठणं ही मोठी बाब आहे. यामुळेच केकेआरसुद्धा आयपीएलचे विजेत आहेत असं मला वाटतं. त्यांचे प्रशिक्षक, संघ व्यवस्थापन आणि सपोर्ट स्टाफने सांघिक प्रयत्न केले. कोरोना काळात मिळालेल्या संधीचा त्यांना चांगला वापर केला. त्यांच्या कामगिरीबद्दल अभिनंदन अशा शब्दात धोनीने केकेआरचे कौतुक केले. धोनीने केलेल्या कौतुकाबद्दल केकेआरच्या संघाने धोनीचे आभार मानले आहेत.

केकेआरच्या संघाने आयपीएलच्या सुरुवातीच्या सात सामन्यापैकी फक्त दोनच सामने जिंकले होते. पॉइंट टेबलमध्ये ते सर्वात शेवटी होते. त्यानंतर संघाला उर्वरित सात पैकी पाच सामने जिंकणे गरजेचे होते. त्यांनी ही कामगिरी करत प्ले ऑफमध्ये स्थान पक्कं केलं.

loading image
go to top