esakal | IPL 2021: धोनी म्हणाला, फेअरवेल सामना चेन्नईच्या मैदानात खेळेन!
sakal

बोलून बातमी शोधा

MS Dhoni

धोनी म्हणाला, फेअरवेल सामना चेन्नईच्या मैदानात खेळेन!

sakal_logo
By
सुशांत जाधव

युएईच्या मैदानात गतवर्षी पार पडलेल्या आयपीएलच्या 13 व्या हंगामात महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जचे बारा वाजले होते. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच त्यांना प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यात अपयश आले. चेन्नईच्या खराब कामगिरीनंतर धोनी आयपीएलमधून निवृत्ती घेणार का? असा प्रश्न उपस्थिती झाला होता. मागील वर्षीच्या हंगामात पंजाब विरुद्धच्या सामन्यात समालोचक डॅनी मॉरिस यांनी पिवळ्या जर्सीतील तुझा हा शेवटचा सामना आहे का? असा प्रश्न विचारला होता. यावर ‘Definitely not’ अजिबात नाही, असे उत्तर देत धोनीने आयपीएलच्या 14 व्या हंगामात खेळणार असल्याचे स्पष्ट केले होते.

आता महेंद्रसिंह धोनीने पुढील हंगामातही खेळणार असल्याचे संकेत दिले आहेत. फेअरवेलचा सामना चेन्नईच्या मैदानात खेळण्याची इच्छा व्यक्त करुन धोनीने आगामी हंगामात चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणार असल्याचे संकेत दिले आहेत.

हेही वाचा: इंग्लंडला मोठा धक्का; स्टार खेळाडू T20 World Cup मधून बाहेर!

इंडिया सीमेंट्सच्या अमृतमहोत्सवाच्या कार्यक्रमानिमित्त धोनीने ऑनलाइनच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी त्याने फेअरवेलचा सामना चेन्नईच्या मैदानात चाहत्यांच्या उपस्थितीत खेळायला आवडेल, असे म्हटले. ज्यावेळी मला थांबायचे असेल त्यावेळी तुम्ही मला चेन्नईच्या मैदानात खेळताना पाहू शकता. चेन्नईमध्येच अखेरचा सामना खेळेन, असा विश्वास त्याने व्यक्त केला.

हेही वाचा: IPL Against RR ट्रेंडिगमागची गंमत; फ्रेंचायझीनही दिलं उत्तर

एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने 5 टी-20 स्पर्धेत बाजी मारली आहे. यात आयपीएल स्पर्धा तीन वेळा जिंकली असून चॅम्पियन्स लीग स्पर्धेच जेतेपद दोनवेळा उंचावले आहे. 2018 पासून चेन्नई सुपर किंग्डला जेतेपद मिळालेले नाही. यंदाच्या हंगामात संघ ही उणीव भरुन काढू शकतो.

loading image
go to top