esakal | IPL 2021: धोनीच्या खेळीची दिल्लीच्या कोचलाही पडली भुरळ, म्हणाला... | MSD
sakal

बोलून बातमी शोधा

MS-Dhoni-Ricky-Ponting

धोनीने मोक्याच्या क्षणी केली तुफान फटकेबाजी

धोनीच्या खेळीची दिल्लीच्या कोचलाही पडली भुरळ, म्हणाला...

sakal_logo
By
विराज भागवत

IPL 2021 Qualifier 1: पात्रता फेरीच्या पहिल्या सामन्यात दिल्लीचा पृथ्वी शॉ आणि ऋषभ पंत या दोघांच्या अर्धशतकाच्या जोरावर प्रथम फलंदाजी करत २० षटकात १७२ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना ऋतुराज गायकवाड आणि रॉबिन उथप्पा या दोघांनी अर्धशतके ठोकली. तर शेवटच्या टप्प्यात धोनीने ६ चेंडूत नाबाद १८ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. 'धोनीचा फॉर्म आता पहिल्यासारखा राहिला नाही', अशा आशयाची टीका करणाऱ्यांना धोनीने चोख प्रत्युत्तर दिलं. धोनीने मोक्याच्या क्षणी केलेल्या फटकेबाजीची दिल्ली कॅपिटल्सचा कोच रिकी पॉन्टींगलाही भुरळ पडली.

हेही वाचा: 'ग्लॅमरस IPL' ... मॅचपेक्षाही 'या' तरूणींच्या अदांचीच चर्चा!

"धोनी हा पहिल्यापासूनच महान खेळाडू आहे. आम्ही डग आऊटमध्ये बसलेलो असताना आमची चर्चा सुरू होती की अशा परिस्थितीत फलंदाजीसाठी आता धोनी येईल की जाडेजा? मी म्हटलं होतं की धोनी येईल आणि सारं वातावरण शांत करेल. त्याने अपेक्षित कामगिरी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. त्याने आज जे केलं त्यामुळे तो जेव्हा संपूर्ण क्रिकेटमधून निवृत्त होईल तेव्हा त्याची ओळख 'बेस्ट फिनिशर' अशीच असेल. धोनीविरूद्ध जे आम्ही ठरवलं होतं ते आम्हाला नीट करता आलं नाही. धोनीचा अनुभव भरपूर आहे. जर तुम्ही चुकलात तर तो तुम्हाला चांगलाच दणका देऊ आहे हे आम्हाला माहिती होतं. तो दीर्घकाळापासून हे करतो आहे. दिल्लीविरूद्ध त्याने पुन्हा ते करून दाखवलं", असं पॉन्टींग म्हणाला.

हेही वाचा: पुढच्या वर्षी CSK कडून खेळेन की नाही सांगू शकत नाही- धोनी

धोनी दिल्लीविरूद्धच्या सामन्यात ऋतुराज गायकवाड बाद झाल्यावर आला. त्यावेळी रविंद्र जाडेजाचा पर्याय असतानाही त्याने स्वत: फलंदाजीला येणं पसंत केलं. धोनीने दुसऱ्याच चेंडूवर एक उत्तुंग षटकार लगावला. त्यानंतर शेवटच्या षटकात टॉम करनने पहिल्या चेंडूवर मोईन अलीला बाद केलं. त्यावेळी धोनीला स्ट्राईक मिळाली. त्याचा फायदा घेत धोनीने दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर चौकारांची हॅटट्रिक लगावत संघाला विजय मिळवून दिला.

loading image
go to top