esakal | IPL Playoff Race : चौथ्या स्थानासाठी KKR आघाडीवर, MI, RR अन् PBKS लाही संधी, पण..
sakal

बोलून बातमी शोधा

ipl 2021

IPL Playoff Race : चौथ्या स्थानासाठी KKR आघाडीवर, MI, RR अन् PBKS लाही संधी

sakal_logo
By
सुशांत जाधव

IPL Playoff Race : आयपीएलच्या 14 व्या हंगामातील साखळी फेरीतील 49 सामन्यानंतर प्ले ऑफचे तीन संघ पक्के झाले आहेत. चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल्सनंतर विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं दिमाखात प्ले ऑफ गाठली. आता चौथ्या संघासाठी प्रतिक्षा बाकी असून यात कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज हे संघ शर्यतीत आहेत. पंजाब किंग्जला उर्वरित एक सामना जिंकून कोलकाता, मुंबई, राजस्थान यांच्या निकालाची प्रतिक्षा करावी लागेल.

कोलकाता नाईट रायडर्स आघाडीवर

कोलकाता नाईट रायडर्सने 49 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला 6 गडी राखून पराभूत करत 13 सामन्यानंतर 6 विजयासह 12 गुण मिळवले आहेत. त्यांचा साखळी फेरीतील अखेरचा सामना हा राजस्थान रॉयल्स विरुद्ध होणार आहे. जर त्यांनी हा सामना जिंकला तर ते 14 गुण मिळवत शर्यतीत टॉपला राहतील. त्यांचा नेट रनरेटही उत्तम असल्यामुळे त्यांना अधिक संधी आहे. राजस्थानसाठीही स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी हा सामना महत्त्वाचा असेल. त्यांनी हा सामना जिंकला तर कोलकाताचं गणितं बिघडू शकते.

हेही वाचा: Video : 'जम्मू एक्स्प्रेस' उमरान मलिनं टाकला 'सुपर फास्ट' चेंडू

राजस्थान-मुंबई प्रत्येकी 2-2 सामने बाकी, एकच संघ 14 गुणापर्यंत पोहचेल

राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांचे प्रत्येकी 2-2 लढती बाकी आहेत. सध्याच्या घडीला दोन्ही संघ 10 गुणासह सहाव्या आणि सातव्या स्थानावर आहेत. त्यांचे रनरेट हे मायनसमध्ये आहे. त्यामुळे उर्वरित दोन्ही सामने चांगल्या रनरेटने जिंकण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही. मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्याच्या निकाल दोघांपैकी एकाला 12 गुणापर्यंत घेऊन जाईल. यातला एकच संघ 14 गुणांपर्यंत पोहचू शकतो. यातही त्यांना रनरेट सुधारावा लागेल.

हेही वाचा: IPL 2021 : KKR प्ले ऑफसाठी तयार; SRH ला दिला शह

पंजाब किंग्जला कशी मिळू शकते संधी, पण...

पंजाब किंग्जचा साखळी फेरीत एकमेव सामना बाकी आहे. चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध ते अखेरचा सामना खेळतील. हा सामना जिंकून ते आपल्या खात्यात 12 गुण जमा करु शकतात. पंजाबने चेन्नईला पराभूत केले आणि मुंबईने हैदराबाद आणि राजस्थानने मुंबईला हरवले तर पंजाबला एक संधी निर्माण होऊ शकते. कारण या परिस्थितीत कोलकाता, राजस्थान, मुंबई आणि पंजाब 12 गुणापर्यंत पोहचतील. रनरेटच्या आधारावर यातील एक संघ प्ले ऑफचे तिकीट बूक करेल.

loading image
go to top