esakal | IPL 2021 : शाहरुखनं प्रितीच्या गालावर हसू फुलवलं; पण कोट्यवधीला बुडवलं
sakal

बोलून बातमी शोधा

शाहरुखनं प्रितीच्या गालावर हसू फुलवलं; पण कोट्यवधीला बुडवलं

शाहरुखनं प्रितीच्या गालावर हसू फुलवलं; पण कोट्यवधीला बुडवलं

sakal_logo
By
सुशांत जाधव

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) च्या हंगामात पंजाब किंग्ज (PBKS) संघाने पुन्हा एकदा निराश केलं. कर्णधार लोकेश राहुलनं गत हंगामाप्रमाणे 500 + धावा केल्या. पण यावेळीही सेनापतीला शिलेदारांची साथ मिळाली नाही. परिणामी पंजाबच्या संघाचा खेळ प्लेऑफ आधीच खल्लास झाला. स्पर्धेतील अखेरच्या टप्प्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात शाहरुख चमकला. शाहरुखच्या संघाविरुद्ध शाहुरुखनं सिक्सर मारून पंजाबला जिंकून दिले. पण त्याचा अख्खा पिक्चर ट्रेलर सारखाच तोकडा होता. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात त्याने केलेली खेळी वगळता त्याला नावाला साजेसा खेळ करण्यात अपयश आले.

पंजाब किंग्जनं 5 कोटी 25 लाख रुपये मोजून शाहरुख खाननला आपल्या ताफ्यात सामील करुन घेतले होते. देशांतर्गत क्रिकेटमधील दमदार कामगिरीमुळे त्याला आयपीएलमध्ये मोठी रक्कम मिळाली. एवढेच नाही तर यंदाच्या हंगामात 14 पैकी 11 सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधीही मिळाली. यात त्याने केवळ 153 धावा केल्या. 47 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. मोठी फटकेबाजी करण्याची क्षमता असलेल्या शाहरुखनं 9 चौकार आणि 10 षटकार मारले.

हेही वाचा: IPL 2021: क्रिस मॉरिसची 1 विकेट पडली 1 कोटीला

पंजाबने त्याच्यासाठी जी रक्कम मोजली होती त्याच्या तुलनेत त्याची कामगिरी खूपच चिल्लर राहिली. ढोबळमानाने कॅलक्युलेशन केले तर त्याने केलेली प्रत्येक धाव 34 लाखाला पडली. शाहरुख खानची मूळ किंमत 20 रुपये होती. तामिळनाडूच्या खेळाडूसाठी लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात चांगली चुरस रंगली होती. दिल्ली कॅपिटल्सने शाहरुखसाठी 1 कोटी बोली लावली.

हेही वाचा: CSK ला 'गंभीर' सल्ला; उणीव भरुन काढायची असेल तर...

त्यानंतर त्यांनी 2 कोटीपर्यंत बोली पुढे नेली. बंगळुरुने यात 20 लाखाची भर घातल्यावर पंजाबने या रेसमध्ये उडी घेतली होती. अखेर पंजाबने 5 कोटी 25 लाख रुपयाला त्याला आपल्या ताफ्यात घेतले. शाहरुख खान आपल्या संघात आल्याचा आनंदही प्रिती झिंटाने त्यावेळी व्यक्त केला होता. पण या शाहरुखला हिट ब्लॉक ब्लास्टरची झलक दाखवता आली नाही. नावाला आणि किंमतीला साजेसा खेळ करण्यात तो अपयशी ठरला.

loading image
go to top