esakal | KKR च्या सुनील नारायणचा 'मै हूँ.. ना शो' RCB आउट!| IPL 2021, Eliminator
sakal

बोलून बातमी शोधा

KKR vs RCB

KKR च्या सुनील नारायणचा 'मै हूँ.. ना शो' RCB आउट!

sakal_logo
By
सुशांत जाधव

IPL 2021 RCB vs KKR Eliminator Match : सुनील नारायणच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने एलिमिनेटरच्या लढतीत बाजी मारली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पहिल्यांदा बॅटिंग करताना कोलकाता नाईट रायडर्ससमोर 139 धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष्य कोलकाता संघाने 4 विकेट राखून पार केले. धावांचा पाठलाग करताना शुबमन गिल 18 (29) आणि व्यंकटेश अय्यर 26 (30) धावा करत पहिल्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी रचली. मध्यफळीतील राहुल त्रिपाठी अवघ्या 6 धावा करुन परतल्यानंतर नितीश राणाने 23 धावांची मोलाची खेळी केली.

या पराभवानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा धुळीस मिळाले. दुसरीकडे प्ले ऑफमध्ये रन रेटच्या जोरावर चौथ्या स्थानावर राहिलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश केला. बुधवारी दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध ते फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी भिडतील.

हेही वाचा: छोट्याखानी खेळीतही कोहलीच्या नावे 'विराट' विक्रम

सुनील नारायणनं गोलंदाजीनंतर फलंदाजीतही सोडली छाप

व्यंकटेश अय्यरची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या सुनील नारायणने गोलंदाजीनंतर फलंदाजीतही धमाकेदार सुरुवात केली. त्याने षटकाराने खाते उघडले. डॅनियल क्रिस्टनच्या षटकात नारायणने 3 षटकार खेचून आपले आक्रमक इरादे दाखवून दिले. त्याने 15 चेंडूत 26 धावा करुन संघाला फ्रंटफुटवर आणून ठेवले. त्यानंतर शाकिब अल हसन आणि कर्णधार इयॉन मॉर्गनने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

हेही वाचा: बॅटिंग घेऊन फसलो की काय? कोहलीचा डग आउटमधील फोटो व्हायरल

स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठीच्या लढतीत विराट कोहलीने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकाताच्यात तुलनेत त्यांनी सुरुवातही चांगली केली होती. पडिक्कल आणि विराट कोहलीने पहिल्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी केली. पण ही जोडी फुटल्यानंतर मोठी नावे पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. कोहलीच्या 39 धावा वगळता एकाही फलंदाला नावाला साजेसा खेळ करता आला नाही. गोलंदाजीमध्ये बंगळुरुकडून चहल, हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट घेतल्या.

loading image
go to top