esakal | IPL 2021, CSK vs RR : राजस्थानचा 'रॉयल' विजय; चेन्नई सुपर किंग्जला हरवून दाखवलं!
sakal

बोलून बातमी शोधा

CSK vs RR

राजस्थानचा 'रॉयल' विजय; चेन्नई सुपर किंग्जला हरवून दाखवलं!

sakal_logo
By
सुशांत जाधव

IPL 2021Rajasthan Royals vs Chennai Super Kings : राजस्थान रॉयल्सने युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबे यांची अर्धशतके चेन्नईकर ऋतूराज गायकावडच्या शतकावर भारी पडली. राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जने दिलेले 190 धावांचे आव्हान 7 विकेट आणि 15 चेंडू राखून पार केले. या विजयासह राजस्थानने स्पर्धेतील आपले आव्हान जिवंत ठेवले आहे. एविन लुईस आणि यशस्वी जयस्वाल यांनी संघाला आक्रमक सुरुवात करुन दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 32 चेंडूत 77 धावा केल्या. लुईसच्या रुपात शार्दुल ठाकूरने चेन्नई सुपर किंग्जला पहिले यश मिळवून दिले. त्याने 12 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 27 धावांचे योगदान दिले. दुसऱ्या बाजूला यशस्वी जयस्वालने 21 चेंडूत 50 धावांची खेळी केली.

दोन्ही सलामीवीर आपले काम फत्ते करुन परतल्यानंतर संजू सॅमसन आणि शिवम दुबे यांनी तिसऱ्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी केली. संजू 24 चेंडूत 28 धावा करुन माघारी फिरला. त्यानंतर शिवम दुबेने ग्ले फिलिफ्सच्या साथीने संघाला विजय मिळवून दिला. दुबेनं 42 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकाराच्या मदतीने नाबाद 64 धावांची खेळी साकारली. दुसऱ्या बाजूला ग्लेन फिलिप्स 8 चेंडूत 14 धावांवर नाबाद राहिला.

हेही वाचा: VIDEO : CSK च्या गोलंदाजांची 'यशस्वी' धुलाई

सलामीवीर ऋतूराज गायकवाडच्या नाबाद 101 धावा आणि अष्टपैलू रविंद्र जाडेजानं 15 चेंडूत केलेल्या नाबाद 32 धावांच्या जोरावर चेन्नईने निर्धारित 20 षटकात 4 बाद 189 धावा केल्या होत्या. फाफ ड्युप्लेसीस 25, सुरेश रैना 3, मोईन अली 21 आणि अंबाती रायडू 2 धावा करुन माघारी फिरले. राजस्थानकडून राहुल तेवतियाने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर चेतन सकारियाला एक विकेट मिळाली.

हेही वाचा: व्वा ऋतूराज! शेवटच्या चेंडूवर षटकार खेचून साजरं केल शतक

प्ले ऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी संघर्ष करणारा राजस्थान रॉयल्स आणि यंदाच्या हंगामात पहिल्यांदा प्ले ऑफचं तिकीट मिळवणारा चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात अबुधाबीच्या मैदानात सामना रंगला होता. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने टॉस जिंकून धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जला बॅटिंगसाठी निमंत्रित केले. स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी राजस्थानचा संघ मोठ्या बदलासह मैदानात उतरला आणि त्यांना यशही मिळाले.

170-3 : शार्दुल ठाकूरला दुसरे यश, राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन ऋतूराजच्या हाती झेल सोपवून झाला बाद, त्याने 28 धावांची खेळी केली

81-2 : पदार्पणाचा सामना खेणाऱ्या असिफनं चेन्नईला मिळवून दिले दुसरे यश, यशस्वी जयस्वाल अर्धशतकी खेळीनंतर तंबूत, त्याने 21 चेंडूत 50 धावा केल्या.

77-1 : लुईसच्या रुपात राजस्थान रॉयल्सच्या संघाला पहिला धक्का, त्याने 12 चेंडूत 27 धावा करत संघाला चांगली सुरुवात करुन दिली. शार्दुल ठाकूरनं चेन्नईला यश मिळवून दिले

राजस्थानची जबरदस्त सुरुवात, सलामीवीर यशस्वी जयस्वालने 19 चेंडूत साजरं केलं अर्धशतक

राजस्थान रॉयल्ससमोर 190 धावांचे लक्ष्य

अखेरच्या षटकात रविंद्र जाडेजा-ऋतूराज गायकवाडची धमाकेदार खेळी दोघांनी पाचव्या विकेटसाठी 22 चेंडूत 53 धावांची भागीदारी केली.

134-4 : अवघ्या 2 धावांवर चेतन सकारियाने रायडूला धाडले तंबूत

114-3 : 17 चेंडूत 21 धावा करुन मोईन अली माघारी, राहुल तेवतियालाच मिळाले यश

57-2 : राहुल तेवतियाला उत्तुंग फटका मारण्याच्या नादात रैनाने गमावली विकेट

47-1 : राहुल तेवतियानं संघाला मिळवून दिलं पहिलं यश, फाफ ड्युप्लेसिस 25 धावांची भर घालून तंबूत परतला यष्टीमागे संजूनं बजावली चोख भूमिका

असे आहेत दोन्ही संघ

Chennai Super Kings (Playing XI): ऋतूराज गायकवाड, फाफ ड्युप्लेसिस, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायडू, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक /कर्णधार) रविंद्र जाडेजा, सॅम कुरेन, शार्दुल ठाकूर, केएम असिफ, जोश हेजलवूज.

Rajasthan Royals (Playing XI): एविन लुईस, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/ कर्णधार), शिवम दुबे, ग्लेन फिलिप्स, डेविड मिलर, राहुल तेवतिया, आकाश सिंग, मयांक मार्कंड्ये, चेतन सकारिया, मुस्तफिझुर रहमान.

राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने टॉस जिंकून घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय

loading image
go to top