esakal | IPL 2021, KKR vs PBKS : मै हूं ना...शाहरुखच्या संघाला मिळाला नवा हिरो!
sakal

बोलून बातमी शोधा

Venkatesh Iyer

IPL 2021 : मै हूं ना...शाहरुखच्या संघाला मिळाला नवा हिरो!

sakal_logo
By
सुशांत जाधव

व्यंकटेश अय्यरने गत विजेत्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्धच्या सामन्यात आयपीएल कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले होते. राजस्थान रॉयल्स विरुद्ध आयपीएलमध्ये पदार्पण करताना त्याने 41 धावांची नाबाद खेळी करुन संघाच्या विजयात मालाचा वाटा उचलला. चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात अय्यरला मोठी खेळी करण्यात अपयश आले. अनुक्रमे 18 आणि 14 धावांवर तो तंबूत परतला. पण त्यानंतर पंजाबविरुद्दच्या महत्त्वपूर्ण सामन्यात त्याने आपल्यातील क्षमता पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखवली.

हेही वाचा: "आता बास झालं" म्हणत ख्रिस गेलची IPL मधून तडकाफडकी माघार

कोलकाताच्या ताफ्यातून लक्षवेधी कामगिरी करणारा व्यंकटेश अय्यर मूळचा (Venkatesh Iyer of Indore) इंदुरचा. शुभमन गिलच्या साथीनं सध्या तो कोलकाताच्या डावाची सुरुवात करतोय. गेल्या काही हंगामापासून कोलकाता संघ नेतृत्व बदलासोबतच सलामीची जोडी बदलण्याचे प्रयोग करताना दिसले. आता व्यंकटेश अय्यरच्या रुपात कोलकाता संघाला नवा हिरो मिळाला आहे.

हेही वाचा: IPL 2021 CSK vs SRH Video: पाहा रंगतदार सामन्याचे Highlights

कोण आहे व्यंकटेश अय्यर?

ऑलराउंडर (All-rounder Venkatesh Iyer) व्यंकटेश अय्यर 26 वर्षीय आहे. मध्यप्रदेशमधील इंदुरच्या या युवा खेळाडूनं 38 देशांतर्गत टी20 सामने खेळले आहेत. डावखुऱ्या हाताने गोलंदाजी करणाऱ्या व्यंकटेश अय्यरच्या खात्यात 21 विकेटची नोंद आहे. 36 च्या सरासरीनं त्याने 724 धावाही केल्या आहेत. यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. प्रथम श्रेणीतील 10 सामन्यात 545 धावा आणि 7 विकेट तर 24 लिस्ट मॅचेसमध्ये 849 धावांसह 10 विकेट नोंद आहेत.

यंदाच्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत व्यंकटेश अय्यरने लक्षवेधी कामगिरी केली होती. फेब्रुवारीत रंगलेल्या विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) स्पर्धेत पंजाबविरुद्ध 198 धावांची धमाकेदार खेळी केली होती. यात त्याने 20 चौकार आणि 7 षटकार खेचले होते.

loading image
go to top