esakal | IPL 2021: "आता बास झालं" म्हणत ख्रिस गेलची IPL मधून तडकाफडकी माघार | Chris Gayle
sakal

बोलून बातमी शोधा

"आता बास झालं" म्हणत ख्रिस गेलची IPL मधून तडकाफडकी माघार

पंजाब किंग्स संघाने ट्विट करून दिली माहिती

"आता बास झालं" म्हणत ख्रिस गेलची IPL मधून तडकाफडकी माघार

sakal_logo
By
विराज भागवत

IPL 2021: पंजाब किंग्स संघाचा तडाखेबाज फलंदाज 'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेल याने युएईमध्ये सुरू असलेल्या IPL स्पर्धेतून तडकाफडकी माघार घेतली. IPL साठी तयार करण्यात आलेल्या बायो-बबलमध्ये घुसमट होत असल्याने त्याने माघार घेतल्याचे स्पष्ट केले आहे. ख्रिस गेल गेल्या महिन्यात कॅरेबियन प्रिमियर लीग स्पर्धेत खेळत होता. त्यावेळी तो एका बायो बबलमध्ये होता. त्यानंतर त्याला IPL साठी तयार करण्यात आलेल्या बायो बबलमध्ये प्रवेश करावा लागला. सततच्या बायो बबलच्या वातावरणामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची भीती असल्याने ख्रिस गेलने उर्वरित IPLमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा: IPL 2021 CSK vs SRH Video: पाहा रंगतदार सामन्याचे Highlights

"गेल्या काही महिन्यांपासून मी आधी CWI बायो बबलचा भाग होतो. त्यानंतर CPLसाठी मला बायो बबलमध्ये राहावं लागलं. आता पुन्हा मी IPLसाठीच्या बायो बबलमध्ये आहे. सातत्याने बायो बबलमध्ये राहिल्याने माझी घुसमट होऊ लागली असून माझ्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होत असल्याची चिन्हं आहेत. अशा परिस्थितीत मला स्वत:ला रिफ्रेश करणं गरजेचं असल्याने मी IPLच्या उर्वरित सामन्यांतून माघार घेत आहे", असे ख्रिस गेलने माघार घेण्याबाबत बोलताना स्पष्ट केलं.

हेही वाचा: Video: अजब गजब क्लीन बोल्ड... मोईन अलीची विकेट एकदा पाहाच

"मला सध्या मानसिक विश्रांतीची गरज आहे. वेस्ट इंडिजच्या संघाला टी२० विश्वचषक स्पर्धेत विजेतेपद मिळवून देण्याच्या दृष्टीने मी मानसिकदृष्ट्या ताजातवाना असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे मी दुबईतील IPL स्पर्धेतून काही वेळाचा ब्रेक घेत आहे. पंजाब किंग्स संघाने मला ब्रेक घेण्याची परवानगी दिली त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. पंजाबने उर्वरित स्पर्धेत धडाकेबाज कामगिरी करावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. पंजाब संघाला माझ्या शुभेच्छा!", असेही ख्रिस गेलने म्हटले आहे.

loading image
go to top