esakal | IPL 2021, Points Table : RCB ची DC अन् CSK शी स्पर्धा, जाणून घ्या कारण...
sakal

बोलून बातमी शोधा

Points Table : RCB ची DC अन् CSK शी स्पर्धा, जाणून घ्या कारण..

Points Table : RCB ची DC अन् CSK शी स्पर्धा, जाणून घ्या कारण..

sakal_logo
By
सुशांत जाधव

IPL 2021 : आयपीएलच्या 14 व्या हंगामातील साखळी फेरीतील केवळ सात लढती उरल्या आहेत. प्ले ऑफमध्ये पोहचल्यानंतरही चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील स्पर्धा संपलेली नाही. प्ले ऑफमध्ये पात्र ठरलेले तीन संघ पहिल्या दोन स्थानामध्ये राहण्यासाठी खटपट करतील.

सध्याच्या घडीला चेन्नई सुपर किंग्ज 12 सामन्यांपैकी 9 विजय आणि 3 पराभवासह 18 गुण मिळवून अव्वलस्थानी आहे. त्याच्यापाठोपाठ दिल्ली कॅपिटल्सनेही 12 सामन्यांपैकी 9 विजय आणि 3 पराभवासह आपल्या खात्यात 18 गुण जमा केले आहेत. उर्वरित दोन्ही सामने जिंकून दोन्ही संघांना 22 गुणांपर्यंत पोहचता येईल. या यादीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ 12 सामन्यातील 8 विजय आणि 4 पराभवासह 16 गुण मिळवून तिसऱ्या स्थानावर आहे. उर्वरित दोन सामने जिंकून 20 गुणासह बंगळुरुचा संघ पहिल्या दोन स्थानावर कब्जा मिळवण्यात प्रयत्नशील असेल.

हेही वाचा: Video : 'जम्मू एक्स्प्रेस' उमरान मलिनं टाकला 'सुपर फास्ट' चेंडू

प्ले ऑफचं तिकीट मिळाल्यावरही स्पर्धा कशासाठी?

गुणतालिकेत अव्वल दोन संघाची Qualifier 1 मध्ये लढत होते. यामध्ये जो संघ जिंकेल तो थेट फायनलमध्ये प्रवेश करतो. तर पराभूत संघ Qualifier 2 मध्ये आणखी एक सामना खेळतो. त्यामुळे गुणतालिकेत पहिल्या दोनमध्ये राहणे फायदेशीर असते. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघ Eliminator सामना खेळतो. यातील विजेता आणि पहिल्या Qualifier 1 मधील पराभूत संघ यांच्यात फायनलसाठी रंगत पाहायला मिळते.

हेही वाचा: IPL Playoff Race : चौथ्या स्थानासाठी KKR आघाडीवर, MI, RR अन् PBKS लाही संधी

कोलकाता नाईट रायडर्स 13 सामन्यातील 6 विजय आणि 7 पराभवासह 12 गुण मिळवत चौथ्या स्थानावर आहे. त्याच्यापाठोपाठ पंजाब किंग्ज 13 सामन्यातील 5 विजयासह 10 गुण मिळवून पाचव्या, राजस्थान रॉयल्सचा संघ 12 पैकी 5 विजयासह 10 गुणांसह सहाव्या, मुंबई इंडियन्स 12 पैकी 5 विजयसाह 10 गुणांसह सातव्या स्थानावर आहेत. प्ले ऑफच्या चौथ्या स्थानासाठी अजूनही हे चार संघ शर्यतीत आहेत. सनरायझर्स हैदराबाद संघाने 12 पैकी केवळ 2 सामने जिंकले असून ते स्पर्धेत कधीच बाहेर पडले आहेत.

loading image
go to top