रोहित शर्मा अन् DRS... बघा नक्की काय घडलं पुढे, पाहा Video

Prithvi-Shaw-Rohit-Sharma-DRS-Video
Prithvi-Shaw-Rohit-Sharma-DRS-Video
Updated on
Summary

पृथ्वी शॉ ने बॅट फिरवली आणि फिल्डर्स अपील करून लागले...

IPL 2021 MI vs DC Video: दिल्लीविरूद्ध मुंबईच्या संघाने २० षटकात १३० धावा केल्या. मुंबईसाठी सामना जिंकणं आवश्यक असल्याने फलंदाजांकडून खूप अपेक्षा होत्या. पण मुंबईच्या एकाही फलंदाजाला चांगली खेळी करता आली नाही. सूर्यकुमारने सर्वाधिक ३३ धावा केल्या. मुंबईच्या संघाने कशीबशी १३० धावांपर्यंत मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना शिखर धवन स्वस्तात बाद झाला. दुसरा सलामीवीर पृथ्वी शॉ देखील पाठोपाठ बाद झाला. यावेळी रोहितने घेतलेल्या DRSची चांगलीच चर्चा रंगली.

Prithvi-Shaw-Rohit-Sharma-DRS-Video
IPL 2021: मुंबई इंडियन्सला 'या' संघापासून आहे सर्वाधिक धोका!

१३१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीचे पृथ्वी शॉ आणि शिखर धवन दोघं उतरले. दोघे चांगल्या लयीत असल्याने त्यांना झटपट बाद करणं आवश्यक होतं. जयंत यादवच्या गोलंदाजीवर शिखर धवनने आधी षटकार लगावला. त्यानंतर लगेच त्याने एकेरी धाव चोरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तो माघारी परतला. पुढच्याच षटकात पृथ्वी शॉ ने फटका लगावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चेंडू त्याच्या पायावर लागला पण पंचांनी त्याला नाबाद ठरवले. अखेर रोहित शर्माने वेळीच DRS घेतला आणि संघाला पृथ्वी शॉ ची विकेट मिळवून दिली.

पाहा व्हिडीओ-

Prithvi-Shaw-Rohit-Sharma-DRS-Video
Video: वेगवान रबाडाला डी कॉकने हाणला अजब गजब सिक्सर!

त्याआधी, दिल्लीने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजी दिली. कर्णधार रोहित शर्मा चांगल्या लयीत होता पण तो ७ धावांवर बाद झाला. क्विंटन डी कॉक (१९) आणि सूर्यकुमार यादव (३३) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण ते दोघे बाद झाले आणि संघाची घडी विस्कटली. सौरभ तिवारी (१५), कायरन पोलार्ड (६), हार्दिक पांड्या (१७), नॅथन कुल्टर नाईल (१), कृणाल पांड्या (१३*) साऱ्यांनीच निराशा केली. अखेरच्या टप्प्यात जयंत यादवने मात्र ४ चेंडूत ११ धावा काढत संघाला १३० धावांपर्यंत पोहोचवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com