Video: धडाकेबाज स्मिथचा फर्ग्युसनने 'असा' उडवला त्रिफळा

Smith-Clean-Bowled
Smith-Clean-Bowled
Summary

पहिल्यांदाच संधी मिळालेल्या स्मिथने केल्या ३९ धावा

IPL 2021 DC vs KKR Video: दिल्लीच्या संघाने कोलकाताविरूद्ध प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत केवळ १२७ धावा केल्या. दिल्लीचे सलामीवीर स्टीव्ह स्मिथ (३९) आणि शिखर धवन (२४) या दोघांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. ऋषभ पंतनेही ३९ धावांची खेळी केली. त्यामुळे दिल्लीच्या संघाला कशीबशी १२७ धावांपर्यंत मजल मारता आली. सामन्यात स्मिथच्या विकेटची चांगलीच चर्चा रंगली.

Smith-Clean-Bowled
IPL 2021: विराट कोहलीबद्दल डेल स्टेनचं महत्त्वाचं वक्तव्य

दिल्लीच्या संघाने दमदार सुरूवात केली होती. शिखर धवनने स्टीव्ह स्मिथच्या साथीने चांगली सुरूवात केली होती. पण फटकेबाजीच्या नादात तो २४ धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर श्रेयस अय्यरही १ धाव काढून माघारी गेला. स्मिथ चांगल्या फॉर्मात होता. पण त्याला एका अप्रतिम चेंडूवर त्रिफळाचीत करण्यात लॉकी फर्ग्युसनला यश मिळाले. आखूड टप्प्याचा चेंडू बाऊन्स होईल अशी स्मिथची अपेक्षा होती. पण स्मिथचा अंदाज चुकला आणि त्याला समजण्याआधीच तो क्लीन बोल्ड झाला.

Smith-Clean-Bowled
IPL 2021: वॉर्नरसह केदार भाऊलाही बसवलं बाकावर!

पाहा स्मिथ बोल्ड झाला ते Video:-

Smith-Clean-Bowled
IPL Record : विकेटमागे धोनीला तोड नाही!

स्टीव्ह स्मिथने अप्रतिम फलंदाजी करण्यास सुरूवात केली होती. त्याने सुनील नारायण आणि वरूण चक्रवर्ती या दोन्ही गोलंदाजांना चांगलाच चोप दिला. अखेर, मध्यमगती गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने स्मिथला माघारी धाडले. स्मिथने ४ चौकार खेचत ३४ चेंडूत ३९ धावा केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com