IPL 2021 संपण्याआधीच विराट कोहलीचा पत्ता कट होणार?

Virat-Kohli
Virat-Kohli
Summary

संघाची निराशाजनक कामगिरी भोवणार असल्याची चिन्हे

IPL 2021: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहली यंदाची स्पर्धा संपल्यानंतर संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे नक्की आहे. त्याने याबद्दल स्वत: माहिती दिली आहे. असे असताना विराट कोहलीला स्पर्धेच्या मध्यातच संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले जाऊ शकते अशी चर्चा आहे. एका माजी क्रिकेटपटूने या संदर्भातील शक्यता व्यक्त केली आहे. बंगळुरूच्या संघाने कोलकातासमोर ज्याप्रकारे खराब कामगिरी करत शरणागती पत्करली, त्यानंतर या चर्चांनी जोर धरला असल्याची माहिती मिळत आहे.

Virat-Kohli
IPL 2021: RCBच्या पराभवावर विराट काय म्हणाला? वाचा सविस्तर

बंगळुरूच्या संघाला कोलकाता संघासमोर चांगली धावसंख्या उभारण्याची संधी होती. पण बंगळुरूचे खेळाडू बेजबाबदारपणे फटकेबाजी करून बाद झाले. केवळ ९२ धावांमध्ये विराटसेना माघारी परतली. विराट कोहली अवघ्या ४ चेंडूत ५ धावा काढून बाद झाला. विराटची संपूर्ण सामन्यातील देहबोली फारशी आक्रमक नव्हती. कर्णधारपद सोडणार असलेल्या कर्णधारासारखीच त्याची देहबोली होती आणि त्याच्या या देहबोलीचा फटका संघाच्या कामगिरीला बसला अशी भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापन स्पर्धा संपण्याची वाट न बघता आधीच विराटला कर्णधारपदावरून दूर करण्याची शक्यता असल्याचे एका माजी क्रिकेटपटूने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

Virat-Kohli
IPL 2021: राजस्थान जिंकलं तरीही गावसकर कर्णधारावर नाराज

"कोलकाताविरूद्धच्या सामन्यात विराट कसा खेळत होता हे तुम्ही साऱ्यांनी पाहिलंच आहे. विराट नक्की काय करतोय हे त्यालाच कळत नव्हतं. त्यामुळे सध्या अशी शक्यता आहे की विराटला मध्यातच कर्णधारपदावरून दूर केलं जाऊ शकतं. IPLमध्ये हे आधीही झालंय. दिनेश कार्तिकला कोलकाताने तर डेव्हिड वॉर्नरला हैदराबादने पदावरून दूर केलं होतं. हंगामाच्या मध्यातच नेतृत्वबदल झाला तर त्याचं कारण कर्णधाराचा राजीनामा हेच असतं. काही पदावरून पायउतार होतात तर काहींना पदावरून दूर केलं जातं. कदाचित बंगळुरूच्या आणखी एका वाईट सामन्यानंतर विराटला थेट पदावरून काढून टाकलं जाऊ शकतं", असं त्या माजी क्रिकेटपटूने स्पष्ट केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com