esakal | Net Run Rate नेमकं काढतात कसे? IPL पाहणाऱ्यांसाठी गणिताची उजळणी
sakal

बोलून बातमी शोधा

Net Run Rate नेमकं काढतात कसे? IPL पाहणाऱ्यांसाठी गणिताची उजळणी

Net Run Rate नेमकं काढतात कसे? IPL पाहणाऱ्यांसाठी गणिताची उजळणी

sakal_logo
By
सुशांत जाधव

How to calculate Net Run Rate In Cricket : क्रिकेटच्या मैदानातील एखादी स्पर्धा जेव्हा रंगतदार अवस्थेत पोहचते त्यावेळी 'नेट रन रेट' हा शब्द कानावर पडतो. अनिश्चिततेच्या खेळात प्लस-मायनसची रंगत निर्माण होते आणि समान गुण असणाऱ्यातील भारी संघ कोणता याची निवड केली जाते. ही निवड करण्यासाठी जी सांख्यिकी पद्धत वापरली जाते त्याला 'नेट रन रेट' असे म्हणतात. अनेकांना प्लस-मायनसचं कॅलक्युलेशन नेमकं करतात कसे असा प्रश्नही पडू शकतो. आयपीएलमध्ये निर्माण झालेल्या तिढ्याच्या पार्श्वभूमीवर या लेखातून आपण कॅलक्युलेशनची किचकट पद्धत सोपी करुन समजावण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हेही वाचा: IPL 2021 Points Table : SRH नं कोहलीच्या RCB चं गणित बिघडवलं

क्रिकेटमध्ये कोणता संघ किती ओव्हर्स खेळला आणि त्यात किती रन्स काढल्या यावरुन निकाल कुणाच्या बाजूने लागला हे स्पष्ट होते. सध्याच्या घडीला क्रिकेटमध्ये प्रामुख्याने 50-50 ओव्हर्स, 20-20 आणि पाच दिवसांचा कसोटी सामना या तीन प्रकारात क्रिकेट खेळले जाते. इंग्लंडमध्ये 100 चेंडूचे सामनेही सुरु झाले आहेत. मर्यादित षटकांच्या निकाल निश्चित असतो. दुसरीकडे कसोटी अनिर्णितही राहू शकते. त्यामुळे 'नेट रन रेट'चा फॉर्म्युला हा मर्यादीत षटकातील स्पर्धेतच वापरला जातो.

हेही वाचा: Video : विल्यमसनमध्ये संचारला सुपरमॅन, अप्रतिम थ्रो करुन फिरवली मॅच

नेट रन-रेट काढण्याचे सूत्र

नेट रन रेट = काढलेल्या एकूण धावा ÷ खेळलेल्या ओव्हर्स - दिलेल्या धावा ÷ टाकलेल्या ओव्हर्स

उदा :

A आणि B यांच्यात सामना झाला. A संघाने पहिल्यांदा बॅटिंग करताना 20 ओव्हर्समध्ये 200 धावा केल्या. आणि B संघाने धावांचा पाठलाग करताना 20 ओव्हर्स खेळून 100 धावा केल्या. तर...

दोन्ही संघाचे 'नेट रन रेट' पुढील प्रमाणे दिसेल

A संघाचे नेट रन-रेट = 200 ÷ 20 - 100 ÷ 20 = +5

B संघाचे नेट रन-रेट = 100 ÷ 20 - 200 ÷ 20 =-5

सध्याच्या घडीला आयपीएलच्या गुणतालिकेत 'नेट रन रेट'चा जो रकाना दिसतो त्यातही असेच कॅलक्युलेशन केले जाते. संपूर्ण स्पर्धेतील सामन्यातून ही आकडेवारी काढण्यात येते.

loading image
go to top