IPL Record : ब्रावोची कमाल; मलिंगाच्या विक्रमाशी बरोबरी

Dwayne Bravo
Dwayne BravoPTI

चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यातील लढतीने वानखेडेच्या मैदानातून आयपीएलच्या 15 व्या हंगामाला सुरुवात झाली. कोलकाता नाईट रायडर्सनं गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जला 6 विकेट्नी पराभूत करत विजयी सलामी दिली. चेन्नईच्या संघाला पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला असला तरी त्यांच्या चाहत्यांसाठी दोन गोष्टी आनंद देणाऱ्या ठरल्या. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे महेंद्रसिंग धोनीचे (MS Dhoni) नाबाद अर्धशतक आणि ब्रावोचा (Dwayne Bravo ) विक्रम. (IPL 2022: Dwayne Bravo Equals Lasith Malinga's Huge Record)

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या लढतीत ड्वेन ब्रावोनं खास विक्रम आपल्या नावे केला. ड्वेन ब्रावोने लसिथ मलिंगाच्या विक्रमाशी बरोबरी केली. IPL मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत ब्रावो आता मलिंगासोबत संयुक्तरित्या अव्वलस्थानावर आहे. आगामी सामन्यात तो मलिंगाचा विक्रम ब्रेक करुन अव्वलस्थानी विराजमान होईल.

कोलकाता विरुद्धच्या लढतीत ड्वेन ब्रावोनं 4 षटकात 20 धावा खर्च करुन 3 विकेट्स घेतल्या. ब्रावोने सॅम बिलिंग्सच्या रुपात तिसरी विकेट घेताच आयपीएलमध्ये मलिंगाच्या 170 विकेट्सच्या विक्रमाशी बरोबरी केली. ड्वेन ब्रावोनं IPL 152 सामन्यात 170 विकेट घेतल्या आहेत. मुंबई इंडियन्सकडून खेळताना लसिथ मलिंगाने 122 सामन्यात 170 विकेट्स घेतल्या आहेत.

Dwayne Bravo
IPL 2022 Mystery Girl : 'मिस्ट्री गर्ल'मुळे कॅमेरामन ट्रोल

IPL मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे पाच गोलंदाज

लसिथ मलिंगा- 122 सामने, 170 विकेट

ड्वेन ब्रावो- 152 सामने, 170 विकेट

अमित मिश्रा- 154 सामने, 166 विकेट

पियूष चावला- 165 सामने, 157 विकेट

हरभजन सिंग- 163 सामने, 150 विकेट

Dwayne Bravo
VIDEO : न्यू सेशन न्यू सेलिब्रेशन; डिजे ब्रावोचा नवा अंदाज

वेस्ट इंडीजचा अष्टपैलू ड्वेन ब्रावो हा पहिल्या हंगामापासून आयपीएलचा भाग राहिला आहे. त्याने मुंबई इंडियन्स, गुजरात लयन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या फ्रेंचायझी संघाकडू प्रतिनिधीत्व केले आहे. ब्रावोने 152 IPL सामन्यात 8.33 च्या इकोनॉमी आणि 24 च्या सरासरीनं 170 विकेट घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या 10 गोलंदाजांच्या यादीत 7 भारतीय खेळाडूंचा तर तीन परदेशी गोलंदाजांचा यात समावेश आहे. सध्याला हंगामात आयपीएलमध्ये सक्रीय असणाऱ्या गोलंदाजात अश्विन सहाव्या क्रमांकावर आहे. त्याने 167 सामन्यात 145 विकेट घेतल्या आहेत. सुनील नरेन (143), भुवनेश्वर कुमार (142), युजवेंद्र चहल (139), जसप्रीत बुमराह (130) हे खेळाडू टॉप टेनमध्ये आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com