VIDEO : साधे कॅच सोडणाऱ्या, धोनीचा ओरडा खाणाऱ्या खेळाडूने पकडला भन्नाट कॅच Mukesh Choudhary took fabulous catch | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IPL 2022 CSK vs RCB Mukesh Choudhary

VIDEO : साधे कॅच सोडणाऱ्या, धोनीचा ओरडा खाणाऱ्या खेळाडूने पकडला भन्नाट कॅच

पुणे : आयपीएलच्या 15 व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) पुन्हा धोनीला कर्णधार केल्यानंतर संघात एक सकारात्मक उर्जा वाहू लागली आहे. याची प्रचिती आज आरसीबीच्या (Royal Challengers Bangalore) सामन्यात देखील आली. चेन्नई सुपर किंग्जचा युवा गोलंदाज मुकेश चौधरीला (Mukesh Choudhary) आजच्या सामन्यात गोलंदाजीत विकेट घेता आली नसली तरी त्याने एक भन्नाट कॅच (Catch) घेत सर्वांचेच लक्ष वेधले. त्याने सर्वांवर साधे साधे झेल सोडणारा, धोनीचा ओरडा खाणारा हाच का तो मुकेश चौधरी अशी म्हणण्याची वेळ आणली.

आरसीबीचा विराट बाद झाल्यानंतर 15 चेंडूत 21 धावा करणाऱ्या रजत पाटीदार (Rajat Patidar) आणि लोमरोरने भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न प्रेटोरियसने हाणून पाडला. प्रोटोरियस (Pretorius) 16 वे षटक टाकण्यासाठी आला. त्याने पहिलाच चेंडू राऊंड द विकेट टाकत रजत पाटीदारला चकवा दिला. या चेंडूवर मोठा फटका मारण्यासाठी पाटीदार सरसावला. मात्र त्याला चेंडू चांगला कनेक्ट करता आला नाही. चेंडू हवेत उंच उडाला. मिडविकेटला उभ्या असणाऱ्या मुकेश चौधरीने या चेंडूकडे धाव घेतली. मात्र चेंडू त्याच्यापूसून दूर असल्याचे जाणवताच त्याने डाईव्ह मारत हा झेल पकडला. या भन्नाट रनिंग कॅचचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आरसीबीने चेन्नई समोर 173 धावांचे आव्हान उभे केले. यात महिपाल लोमरोरच्या 42 धावांचा मोलाचा वाटा आहे. याचबरोबर अखेरच्या षटकात आक्रमक फलंदाजी करणाऱ्या दिनेश कार्तिकने देखील 17 चेंडूत 26 धावा करत चांगले योगदान दिले. आरसीबीचे हे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या सीएसकेची फलंदाजी चांगल्या सुरूवातीनंतर ढेपाळली. त्यांचे अवस्था 15 षटकात 4 बाद 109 धावा अशी झाली. कॉनवॉयने 56 धावांची झुंजार खेळी केली. मात्र मोक्याच्या क्षणी त्याला हसरंगाने बाद केले.