
IPL 2022 : 'मसल पॉवर' रसेलचा 200 + स्ट्राइक रेटचा रेकॉर्ड
IPL 2022, PBKS vs KKR : मुंबईतील वानखेडेच्या मैदानात रंगलेल्या पंजाब किंग्ज विरुद्धच्या लढतीत कॅरेबियन ऑल राउंडर आंद्रे रसेलनं (Andre Russell) आपल्या मसल पॉवरची झलक दाखवून दिली. त्याने 31 चेंडूत 2 चौकार आणि 8 षटकाराच्या मदतीने 70 धावांची वादळी खेळी केली. लिविंगस्टोनच्या गोलंदाजीवर उत्तुंग षटकार खेचत त्याने संघाच्या विजयावर मोहर उमटवली. या सामन्यात आंद्रे रसेलनं 225.81 स्ट्राइक रेटनं धावा कुटल्या. आयपीएलमध्ये (IPL) एका संघाविरुद्ध 300 पेक्षा अधिक धावा आणि सर्वाधिक स्ट्राइक रेटमध्ये तो पहिल्या स्थानावर आहे.
हेही वाचा: IPL Record : उमेश यादवचा 'सिक्सर'; रोहित-गेलला 'धोबीपछाड'
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या आतापर्यंतच्या लढतीत त्याने 207.9 च्या स्ट्राइक रेटनं 300 + धावा केल्या आहेत. पंजाब विरुद्ध त्याने 300 पेक्षा अधिक धावा करताना 204.3 च्या स्ट्राइक रेट ठेवत धावा काढल्या आहेत. दोन संघाविरुद्ध 200 पेक्षा अधिक स्ट्राइक रेटनं धावा करणारा आंद्रे रसेल एकमेव खेळाडू आहे. या यादीत ख्रिस गेलचाही समावेश आहे. पुणे वॉरियर्स विरुद्ध खेळताना गेलनं 300 पेक्षा अधिक धावा करताना 199.5 च्या स्ट्राइक रेटनं धावा कुटल्या आहेत. डेक्कन चार्जर विरुद्ध 181.4 तर विरेंद्र सेहवागने डेक्कन चार्जर्स विरुद्ध 178.1 च्या स्ट्राइकने 300 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
हेही वाचा: VIDEO : 'सुहाना' सफर और ये मोसम 'हसीन'| PBKS vs KKR
आंद्रे रसेल याने आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत 87 सामन्यातील 72 डावात 30.42 च्या सरासरीसह 179.32 च्या स्ट्राइक रेटनं 1795 धावा केल्या आहेत. 88 ही त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम खेळी आहे. त्याच्या खेळीत 10 अर्धशतकांचा समावेश आहे. ऑल टाइम स्ट्राइक रेटमध्ये तो अव्वल असून त्याच्यापाठोपाठ कोलकाता नाइट रायडर्सच्या ताफ्यात असलेल्या कॅरेबियन अष्टपैलू सुनील नरेन दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंतच्या 137 सामन्यात 161.54 च्या स्ट्राइक रेटनं 966 धावा केल्या आहेत. 93 सामन्यातील 93 डावात 156.46 च्या स्ट्राइक रेटनं धावा कुटणारा विरेंद्र सेहवाग या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.
Web Title: Ipl 2022 Highest Sr Vs A Team In Ipl 300 Plus Runs Andre Russell Record Vs Rcb And Pbks
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..