VIDEO : 'सुहाना' सफर और ये मोसम 'हसीन'| PBKS vs KKR

Suhana Khan Aryan Khan Supporting KKR
Suhana Khan Aryan Khan Supporting KKR Sakal

मुंबई : पंजाब किंग्ज विरुद्ध उमेश यादवचा (Umesh Yadav) भेदक मारा आणि त्यानंतर आंद्रे रसेलनं (Andre Russell ) केलेली तुफान फटकेबाजी याच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्स संघाने वानखेडेच्या मैदानात 6 विकेट्स आणि 33 चेंडू राखून स्पर्धेतील दुसरा विजय नोंदवला. या विजयासह कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders ) संघ 3 पैकी 2 सामन्यातील विजयासह गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहटला आहे. पंजाब किंग्जने (Punjab Kings ) पहिल्यांदा बॅटिंग करताना 18. 2 षटकात 137 धावा केल्या होत्या.

Suhana Khan Aryan Khan Supporting KKR
शुटिंग ते थेट स्टेडियम; धनश्रीनं व्हिडिओतून सांगितली स्टोरी

या धावांचा पाठलाग करताना कोलकाताची सुरुवात खराब झाली. एकवेळी त्यांची अवस्था 5 बाद 51 धावा अशी होती. पण रसेलनं तुफानी फटकेबाजी करत 15 व्या षटकात षटकार खेचत कोलकाताचा विजय निश्चित केला. कोलकाता नाईट रायडर्स संघाला प्रोत्साहन देण्यासाठी शाहरुख खानची मुलगी सुहाना खान (Suhana Khan ), मुलगा आर्यनसह (Aryan Khan ) चिमुकला अब्रामही (abhram) स्टेडियमवर उपस्थितीत होते. ठराविक अंतराने कॅमेऱा त्यांच्याकडे फिरताना दिसला. मागील हंगामात आश्चर्यकारकरित्या फायनल गाठलेला कोलकाता संघ कोलकाताचा संघ श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली यंदा सुरुवातीपासून दमदार कामगिरी करत आहे. संघाची कामगिरी पाहून सुहानाला आपल्या चेहऱ्यावरील आनंद लपवता आला नाही. तिचा उत्साह बघण्याजोगाच होता. स्टँडमधील तिचे तेवर "सुहाना सफर और मोसम हसीं..." गाण्याची आठवण करुन देणारे असेच होते.

Suhana Khan Aryan Khan Supporting KKR
KKR vs PBKS : आंद्रे रसेलच्या बॅटने वानखेडेवर घातला धुमाकूळ

सामना जिंकल्यावर सुहाना खान मोछ्या उत्साहाने विजयाचे सेलिब्रेशन करताना दिसून आले. सोशल मीडियावर तिचे फोटो आणि खास अंदाजातील रिअॅक्शनचे फोटो व्हायरल होत आहे. ट्विटरवर सुहाना खान हॅशटॅगही ट्रेंडिगमध्ये दिसत असून तिच्या खास अंदाजाला चांगली पसंती मिळताना दिसते. आयपीएलच्या मेगा लिलावातही आर्यन आणि सुहाना खान दोघेही लक्षवेधी ठरले होते. आता प्रत्येक सामन्यात ती संघाला प्रोत्साहन देण्यासाठी स्टेडियममध्ये हजेरी लावताना पाहायला मिळत आहेत.

कोलकाता संघ यंदाच्या हंगामात दमदार कामगिरी करताना दिसतोय. नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली संघाने सलामीच्या लढतीत गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जला पराभवाचा दणका दिला. विशेष म्हणजे या सामन्यातही त्यांनी 6 विकेट्सने विजय नोंदवला होता. रॉयल चॅलेंजर्स विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्यांना तीन विकेट्सनी पराभूत व्हावे लागले. यातून सावरुन पुन्हा त्यांनी दमदार कमबॅक केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com