'धोनी रिव्ह्यू सिस्टम'वर अमरावतीचा Jitesh Sharma पडला भारी!

MS Dhoni VS  Jitesh Sharma
MS Dhoni VS Jitesh Sharma Sakal

Who is Jitesh Sharma IPL 2022: चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात पंजाब किंग्जच्या विजयात जितेश शर्माने लक्षवेधी कामगिरी बजावली. आयपीएलच्या पदार्पणाच्या सामन्यात त्याने फलंदाडीवेळी उपयुक्त 26 धावांची खेळी केली. त्याने 152.94 च्या स्ट्राइक रेटनं धावा करताना 3 उत्तुंग आणि डोळ्याचे पारणे फेडणारे षटकारही खेचले. ड्वेन प्रिटोरियसने रॉबिन उथप्पाकरवी त्याला झेलबाद केले.

पंजाब किंग्जच्या विकेटकीपर-बॅट्समन जितेश शर्मा (Jitesh Sharma) याचा जन्म महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये (Amravati Maharashtra) झाला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो विदर्भ संघाचे (Vidarbha Cricket Team) प्रतिनिधीत्व करतो. आयपीएलच्या मेगा लिलावात पंजाब किंग्जने त्याला 20 लाख रुपयांच्या मूळ किंमतीसह खरेदी केले होते. महाराष्ट्राचा हा भिडू पंजाबचे जेतेपदाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ट्रम्प कार्ड ठरू शकतो.

MS Dhoni VS  Jitesh Sharma
तिच्यासोबत गप्पा मारताना रोहितनं दिला कटू आठवणीला उजाळा

आधी फंलदाजीवेळी आपल्या भात्यातील फटकेबाजीचा नजराणा दाखवून दिल्यावर त्याने विकेटमागे चपळाई दाखवली. क्षेत्ररक्षणावेळी जितेश शर्मानं घेतलेला एक निर्णय संघाच्या विजय पक्का करण्यासाठी महत्त्वूपूर्ण ठरला. धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जचे आघाडीचे फलंदाज स्वस्तात माघारी फिरले होते. महेंद्र सिंग धोनी जोपर्यंत मैदानात होता तोपर्यंत सामना पंजाबसाठी सेफ नव्हता.

MS Dhoni VS  Jitesh Sharma
CSK vs PBKS: सीएसकेच्या पदरी पराभवाची हॅट्ट्रिक; लिव्हिंगस्टोन ठरला किंग

चेन्नईच्या डावातील 17 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर ओवर में राहुल चाहरने महेंद्रसिंग धोनीला चकवा दिला. धोनीने या चेंडूवर जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू थेट जितेन शर्माच्या हाती गेला. जितेश शर्माने महत्त्वपूर्ण कॅच पकडला. पण मैदानातील पंचांनी धोनीला नॉट आउट दिले. क्षणाचाही विलंब न करता जितेशनं आपल्या कॅप्टनकडे पाहत रिह्व्यूची मागणी केली. मयांक अग्रवालनेही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. धोनी बाद असल्याचे रिप्लायमध्ये स्पष्ट झाले. ही विकेट राहुल चाहरच्या खात्यात जमा झाली असली तरी यात जितेन शर्माचे योगदान हे महत्त्वपूर्ण होते. पदार्पणाच्या सामन्यात धोनी रिव्ह्यू सिस्टम विरुद्ध त्याने यशस्वी रिव्हूय घेतला ही देखील गोष्ट लक्षवेधी अशीच आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com