KKR च्या राणादाची पॉवर; सिक्सरनं फोडला SRH डग आउटमधला फ्रीज (VIDEO) | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

KKR vs SRH

KKR च्या राणादाची पॉवर; सिक्सरनं फोडला SRH डग आउटमधला फ्रीज (VIDEO)

सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन याने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. गोलंदाजांनी आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत कोलकाताच्या संघाला सुरुवातीला धक्क्यावर धक्के दिले. पॉवर प्लेमध्ये संघाने तीन महत्त्वपूर्ण विकेट गमावल्या. संघ अडचणीत असताना नितीश राणा आणि कर्णधार अय्यरने संघाचा डाव सावरला. श्रेयस अय्यर 28 धावा करुन परतल्यानंतर राणाने आपली खेळी कायम ठेवत संघाला अडचणीतून बाहेर काढले.

हेही वाचा: KKR vs SRH : अनोख्या विक्रमी सामन्यात फिंचचा फ्लॉप शो!

राणाने 36 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 54 धावा कुटल्या. त्याची ही अर्धशतकी खेळी संघासाठी चांगलीच फायदेशीर ठरली. कोलकाता संघाच्या डावातील 13 व्या षटकात त्याने मारलेल्या सिक्सरने तर कमालच केली. उमरान मलिकच्या पहिल्याच चेंडूवर नितीश राणाने थर्ड मॅनच्या दिशेनं फ्लॅट सिक्सर लगावला. राणाची ताकद अन् उमरान मलिकचा वेग यातून बसलेल्या फटक्यानं सनरायजर्स हैदराबादच्या डग आउटमधला फ्रीजची काच फुटली. या षटकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा: VIDEO : उमरानचा खतरनाक यॉर्कर; श्रेयसच्या बोल्डवर 'स्टेनगन' हसली

नितीश राणाने 32 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकार मारून आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील आपले पहिले अर्धशतक साजरे केले. तो मोठी खेळी करेल, असे वाटत असताना नटराजनने त्याला पूरनकरवी झेलबाद करत तंबूचा रस्ता दाखवला. त्याच्या या खेळीनंतर आंद्रे रसेल नावाचे वादळ पाहायला मिळाले. त्याने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेत अखेरच्या 25 चेंडूत 49 धावांची नाबाद खेळी करत संघाची धावसंख्या 175 धावांपर्यंत पोहचवली.

Web Title: Ipl 2022 Kkr Vs Srh Nitish Rana Creates Panic In Sunrisers Hyderabad Dugout Breaks Refrigerator Glass With Flat Six

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..