IPL Record : हैदराबाद विरुद्ध स्टाइलिश KL राहुलचा खास विक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

KL Rahul

IPL Record : हैदराबाद विरुद्ध स्टाइलिश KL राहुलचा खास विक्रम

इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 15 व्या हंगामातील नवी फ्रेंचायझी लखनौ सुपर जाएंट्सचे (LSG) नेतृत्व करणाऱ्या लोकेश राहुलनं (KL Rahul) खास विक्रमाला गवसणी घातली. सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्धच्या सामन्यात त्याने नावाला साजेसा खेळ केला. त्याने अर्धशतकी खेळी केली. या अर्धशतकी खेळीसह लोकेश राहुलनं खास विक्रम आपल्या नावे केलाय.

लखनौ सुपर जाएंट्सच्या कर्णधाराने टी-20 कारकिर्दीत 50 अर्धशतके पूर्ण केली. यात आंतरराष्ट्रीय आणि लीग सामन्यांतील खेळीचा समावेश आहे. अर्धशतकांचे शतक करणारा भारताचा तो पाचवा खेळाडू आहे. सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात केएल राहुलने 50 चेंडूत 68 धावांची खेळी केली. आपल्या या खेळीत त्याने 6 चौकार आणि एक उत्तुंग षटकार खेचला. या खेळीसह लखनौ संघाकडून सर्वाधिक धावाही त्याच्या खात्यात जमा झाल्या आहेत.

हेही वाचा: रोनाल्डोचा मेंदू स्कॅन करेन; फिटनेससाठी कोहलीचा 'विराट' प्लॅन

टी-20 क्रिकेटमध्ये स्रावधिक वेळा अर्धशतकी खेळी साकारणारे भारतीय खेळाडू

विराट कोहली- 328 सामने, 76 अर्धशतके

रोहित शर्मा- 372 सामने, 69 अर्धशतके

शिखर धवन- 305 सामने, 63 अर्धशतके

सुरेश रैना- 336 सामने , 53 अर्धशतके

केएल राहुल- 175 सामने, 50 अर्धशतके

हेही वाचा: Video : केनच्या सुपर कॅचवर काव्या झाली फिदा!

लोकेश राहुलने सर्वात कमी कालावधीत इतपर्यंतचा टप्पा गाठला आहे. यादीतील सर्वांना मागे टाकून टॉपर होण्याची त्याला संधी आहे. लोकेश राहुलला टी-20 क्रिकेटमधील स्टायलिस्ट क्रिकेट म्हणून ओळखले जाते. टी-20 मध्ये त्याच्या नावे चार शतक आहेत. केएल राहुल मागच्या हंगामापर्यंत पंजाब किंग्जचे नेतृत्व करताना दिसला होता. मेगा लिलावापूर्वी लखनौनं 17 कोटी मोजून त्याला आपल्या ताफ्यात सामील करुन घेतलं होतं.

Web Title: Ipl 2022 Kl Rahul Record 50th Fifty In T20 Cricket Lucknow Supergiants Vs Sunrisers Hyderabad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :IPLIPL 2022Lokesh Rahul
go to top