IPL 2022: मुंबई हरली, पण इलेक्ट्रिशियनच्या पोरानं मनं जिंकली

 Mumbai Indians young tilak varma
Mumbai Indians young tilak varmasakal

देशांतर्गत क्रिकेटमध्ये हैदराबाद संघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या तिलक वर्माने (Tilak Varma) आयपीएलच्या (IPL 2022) यंदाच्या हंगामात सर्वांचे लक्ष वेधलं आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या लढतीत 22 धावांची खेळी करणाऱ्या तिलक वर्माने राजस्थान विरुद्ध संघ अडचणीत असताना अर्धशतक (33 चेंडूत 61 धावा) झळकावले. त्याची ही खेळी कमालीची अशीच आहे. 20 लाख मूळ किंमत असलेल्या या युवा खेळाडूवर मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) 1.70 कोटीचा डाव का खेळला? याची झलक आता पाहायला मिळत आहे.

डावखुऱ्या हाताने फलंदाजी करणारा तिलक वर्मा सैयद मुश्ताक अली ट्रॉफी 2021-22 च्या हंगामात दमदार कामगिरी केली होती. या स्पर्धेतील खेळीच्या जोरावरच त्याला मेगा लिलावात मूळ किंमतीच्या आठपट भाव मिळाला.

 Mumbai Indians young tilak varma
GT vs DC : अक्षर पटेल मोठ्या आयपीएल रेकॉर्डच्या उंबरठ्यावर

तिलक वर्माची आतापर्यंतची कारकिर्द

तिलक वर्माने 16 लिस्ट-A सामने खेळले आहेत. यात त्याने 52.26 च्या सरासरीनं 784 धावा केल्या आहेत. त्याच्या खात्यात तीन शतक आणि तीन अर्धशतकाची नोंद असून नाबाद 156 धावा ही त्याची सर्वोच्च खेळी आहे. तिलक वर्माने आपल्या एकमेव प्रथण श्रेणी सामन्यात 39 धावा केल्या होत्या. याशिवाय 15 टी-20 सामन्यात 29.30 च्या सरासरीनं त्याने 381 धावा केल्या आहेत. 19 वर्षीय तिलक वर्माने टी-20 मध्ये तीन अर्धशतक झळकावली आहेत.

मुश्ताक अली स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी

मुश्ताक अली ट्रॉफी 2021-22 हंगामात तिलकने 7 सामन्यात 35.83 च्या सरासरीनं आणि 147.26 च्या स्ट्राइक रेटनं 215 धावा केल्या होत्या. या स्पर्धेत त्याने दोन अर्धशतके झळकावली होती.

 Mumbai Indians young tilak varma
MI vs RR : रोहित आउट झाला अन् रितिकाचा चेहरा पडला!

अंडर 19 कामगिरीमुळे आला होता चर्चेत

2020 च्या अंडर-19 वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाला फायनलमध्ये बांगलादेश कडून पराभवाचा सामना करावा लागला. तिलक वर्मा उपविजेत्या भारतीय संघाचा सदस्य होता. त्याने अंडर-19 स्तरावर 23 सामन्यात 38.88 च्या सरासरीने 661 धावा केल्या आहेत. यात त्याने 110 सर्वोच्च धावसंख्येसह एक शतक आणि चार अर्धशतकही झळकावली आहेत.

कोचिंगसाठीही नव्हते पैसे

टिळकचे वडील व्यवसायाने इलेक्ट्रिशियन (Son Of Electrician). मुलाच्या क्रिकेट कोचिंगचा खर्च भागवण्या इतके त्यांचे उत्पन्न नव्हते. त्याच्यातील क्षमता पाहून तिलकला त्याचे प्रशिक्षक सलाम बयाश यांनी मदतीचा हात पुढे केला आणि त्याच्या क्रिकेट कोचिंगसह राहण्याची आणि भोजनाची संपूर्ण व्यवस्था केली. आज तो मेहनतीच्या जोरावर त्याने मोठी मजल मारलीये.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com