
MI vs SRH : मुंबई अखेरपर्यंत झुंजली मात्र शेवटच्या षटकात हैदराबादची सरशी
मुंबई : अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात सनराईजर्स हैदराबादने मुंबईचा अवघ्या 3 धावांनी पराभव केला. हैदराबादच्या 193 धावांचा पाठलाग करताना मुंबईने 7 बाद 190 धावांपर्यंत मजल मारली. मुंबईकडून रोहित शर्माने सर्वाधिक 48 तर टीम डेव्हिडने 18 चेंडूत 46 धावा केल्या. हैदराबादकडून उमरान मलिकने भेदक मारा करत 23 धावात 3 विकेट घेतल्या. हैदराबादकडून राहुल त्रिपाठीने सर्वाधिक 76 धावा केल्या.
HIGHLIGHTS
अखेरच्या षटकात रमनदीपची फटकेबाजी
रमनदीपने अखेरच्या षटकात विजयासाठी 18 धावांची गरज असताना 15 धावा करून सामना रंगतदार स्थितीत नेला अखेर मुंबईला विजयासाठी 3 धावा कमी पडल्या.
127-4 : उमरानने 15 व्या षटकात केली दुसरी शिकार
उमरान मलिकने 15 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर तिलक वर्माला बाद केले. त्यानंतर याच षटकाच्या सहाव्या चेंडूवर डॅनियल सॅम्सला 15 धावांवर बाद केले.
123-3 : उमरान ऑन फायर
सेट झालेल्या इशान किशनला बाद केल्यांनंतर उमरान मलिकने मुंबईचा स्टार युवा फलंदाज तिलक वर्माला देखील 8 धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
101-2 : इशान किशनचेही अर्धशतक हुकले
रोहित शर्मा पाठोपाठ इशान किशनचे देखील अर्धशतक हुकले. मुंबईला शतकी मजल मारून दिल्यानंतर तो 43 धावांवर असताना उमरान मलिकच्या गोलंदाजीवर गर्गकडे झेल देत पॅव्हेलियनमध्ये परतला.
95-1 : रोहित फॉर्ममध्ये परतला, मात्र...
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा अखेर फॉर्ममध्ये परतला. त्याने सलामीवीर इशान किशन सोबत नाबाद अर्धशतकी भागीदारी रचत मुंबईला 10 षटकात 89 धावांपर्यंत पोहचवले. मात्र अर्धशतकाला दोन धावांची गरज असताना तो वॉशिंग्टनला मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला.
निकोलस पूरन 21 चेंडूत 38 धावा करून बाद
राहुल त्रिपाठीबरोबर तिसऱ्या विकेटसाठी 42 चेंडूत 76 धावांची भागीदारी रचणाऱ्या निकोलस पूरनला मेरेडिथने बाद केले.
राहुल त्रिपाठीची दमदार बॅटिंग
राहुल त्रिपाठीने दमदार फलंदाजी करत नाबाद अर्धशतकी खेळी केली.
96-2 : रमनदीप सिंगने जोडी फोडली
प्रियाम गर्ग आणि राहुल त्रिपाठीने दुसऱ्या विकेटसाठी 78 धावांची भागीदारी रचली. रमनदीप सिंगने 26 चेंडूत 42 धावा करणाऱ्या प्रियाम गर्गला बाद करत ही जोडी फोडली.
18-1 : हैदराबादला पहिला धक्का
डॅनियल सॅम्सने हैदराबादला पहिला धक्का दिला. त्याने अभिषेक शर्माला 9 धावांवर बाद केले.
मुंबईने नाणेफेक जिंकली
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईने आपल्या संघात दोन बदल केले आहेत. मयांक मार्कंडेय आणि संजय यादव यांना संधी दिली आहे. तर हैदराबादने देखील प्रियाम गर्ग आणि फजल फारूकी यांना संधी दिली आहे.
Web Title: Ipl 2022 Mumbai Indians Vs Sunrisers Hyderabad 65th Match Live Cricket Score Highlights
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..