KKR vs PBKS : आंद्रे रसेलच्या बॅटने वानखेडेवर घातला धुमाकूळ

Kolkata Knight Riders Defeat Punjab kings Andre Russell blasting Batting
Kolkata Knight Riders Defeat Punjab kings Andre Russell blasting Batting esakal

Kolkata Knight Riders Defeat Punjab kings Andre Russell blasting Batting aas86

मुंबई : आंद्रे रसेलच्या (Andre Russell) तुफान फटकेबाजीमुळे केकेआरने (Kolkata Knight Riders) पंजाब किंग्जचे (Punjab kings) 137 धावांचे आव्हान 14.3 षटकात पार करत सामना खिशात टाकला. केकेआरची अवस्था एकेवेळी 4 बाद 51 अशी होती मात्र आंद्रे रसेल (31 चेंडूत 70 धावा) आणि सॅम बिलिंग्जने (23 चेंडूत 24 धावा) पाचव्या विकेटसाठी 90 धावांची भागीदारी रचत केकेआरचा विजय खेचून आणला. विशेष म्हणजे आंद्रे रसेलने नाबाद 70 धावात 48 धावा या षटकारांनी पूर्ण केल्या.

Kolkata Knight Riders Defeat Punjab kings Andre Russell blasting Batting
Women's Cricket : लक्ष्मणच्या खांद्यावर पडणार मोठी जबाबदारी; रमेश पोवारचं काय?

पंजाब किंग्जने कोलकाता नाईट रायडर्स समोर ठेवलेल्या 138 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरची सुरुवात खराब झाली. पॉवर प्लेमध्ये केकेआरचे सलामीवीर अजिंक्य रहाणे (11) आणि व्यकटेश अय्यर (3) स्वस्तात माघारी गेले. त्यानंतर त्यानंतर श्रेयस अय्यरने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र राहुल चाहरने एकाच षटकात अय्यर आणि नितीश राणाला बाद करत केकेआरची अवस्था 4 बाद 51 अशी केली.

मात्र त्यानंतर आंद्रे रसेल आणि सॅम बिलिंग्ज यांनी डाव सावरत केकेआरला विजयाच्या दिशाने नेले. आंद्रे रसेलने आक्रमक फलंदाजी करत अर्धशतक ठोकले. त्यामुळे केकेआरने फसलेला सामना 15 षटकाच्या आतच संपवला. रसेलने नाबाद 70 धावा ठोकल्या तर बिलिंग्जने त्याला 23 चेंडूत 24 धावा करून चांगली साथ दिली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 90 धावांची भागीदारी रचली.

Kolkata Knight Riders Defeat Punjab kings Andre Russell blasting Batting
दुबे नाही तर 'हे' आहे CSK च्या पराभवाचे कारण; कर्णधाराचा खुलासा

आयपीएलच्या 8 व्या सामन्यात आज कोलोकाता नाईट राडर्सने पंजाब किंग्जचा डाव 137 धावात गुंडळला. केकेआरकडून उमेश यादव, टीम साऊदीने भेदक मारा करत पंजाबच्या फलंदाजीला खिंडार पाडले. सामन्याच्या पहिल्याच षटकात विकेट मिळवण्याचा सिलसिला उमेश यादवने याही सामन्यात कायम ठेवला. त्याने 4 षटकात 23 धावा देत 4 विकेट घेतल्या तर टीम साऊदीने 2 विकेट घेत त्याला चांगली साथ दिली. या दोघांच्या भेदक माऱ्यामुळे पंजाबची अवस्था 8 बाद 102 अशी झाली होती. मात्र 9 व्या विकेटसाठी कसिगो रबाडा आणि ओडेन स्मिथने 35 धावांची भागीदारी रचत पंजाबला 137 धावांपर्यंत पोहचवले. या भागीदारीत रबाडाच्या 25 धावांचे मोठे योगदान होते. पंजाबकडून राजपक्षाने सर्वाधिक 31 धावा केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com