
कोण खेळणार प्लेऑफ? ५ संघाचं भवितव्य पणाला, अशी असतील समीकरणे
आयपीएलचा 66 सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला. केकेआरचा लखनौने 2 धावांनी पराभव केला, आणि यासह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानांवर पोचला. त्यामुळे प्लेऑफची लढत आता रोमांचक झाली आहे. मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता हे तीन संघ आता प्ले-ऑफ मधून बाहेर पडले आहे. तर गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे दोन संघांनी आपले स्थान प्ले-ऑफ मध्ये निश्चित केले आहे. आता या व्यतिरिक्त 5 संघांमध्ये प्ले ऑफमध्ये जाण्याच्या आशा अजूनही जिवंत आहेत.(IPL 2022 Playoffs Qualification)
लखनौ आणि केकेआर यांनी हंगामाचा 14 सामने खेळले आहे. आता बाकीच्या संघांचा 1-1 सामना राहिला आहे. गुणतालिकेत राजस्थान 16 गुणांसह तिसऱ्या स्थानांवर आहे. पण नेट रनरेट वरून इतर संघही वर जाऊ शकतात. जर राजस्थानला प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करायच असलं तर 20 मे ला कोणत्याही परिस्थितीत चेन्नई सुपर किंग्जला हारवाव लागेल.
हेही वाचा: लखनौच्या विजयानंतर केएल राहुलने एक्स्ट्रा पैशाची मागणी का केली?
आरसीबीला जर प्ले-ऑफ मध्ये निश्चित करायचं असलं तर पुढचा सामना जिकावा लागलं. 19 मे ला आरसीबीचा सामना गुजरातशी होणार आहे. त्याचे आता 14 गुण आहेत, एका विजयासह प्ले-ऑफचे स्थान निश्चित करेल. परंतु त्याचा रन रेट -323 आहे. अशा वेळेस आरसीबीला मोठा विजय आवश्यक आहे.
हेही वाचा: BAN vs SL: live मॅचमध्ये अंपायर मैदानाबाहेर; कारण खूप त्रासदायक
तर दिल्लीला 21 तारखेला मुंबई इंडियन्सविरुद्ध विजय मिळवून 16 गुण मिळवायचे आहेत. 22 तारखेला सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना होणार आहे. आरसीबी आणि दिल्ली या दोन्ही संघांनी जर सामना हारला तर हैदराबाद आणि पंजाबमधील नेट रनरेटच्या आधारे प्ले ऑफमध्ये जाण्याची संधी असेल. हैदराबाद आणि पंजाबचे सध्या प्रत्येकी 12 गुण आहेत.
Web Title: Ipl 2022 Two Teams Playoff 3 Teams Out Of Ipl Now 5 Teams Playoff Race Ipl 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..