IPL 2023 playoffs scenarios: राजस्थान के मन में फूटे लड्डू! RCB सकट मुंबईचा होऊ शकतो गेम; जाणून घ्या समीकरण

आयपीएल 2023 मधील प्लेऑफची लढत झाली रोमांचक
MI vs RCB IPL 2023
MI vs RCB IPL 2023

IPL 2023 Playoff Qualification Scenarios : आयपीएल 2023 मधील प्लेऑफची लढत रोमांचक झाली आहे. शनिवारी चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा तर लखनौ सुपर जायंट्सने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करून प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले. आता प्लेऑफमध्ये एकच जागा उरली असून तीही आजच्या दोन सामन्यांनी ठरणार आहे.

मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना होणार आहे. आता प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी मुंबई, बेंगळुरू आणि राजस्थान यांच्यात लढत आहे. यापैकी जो संघ पात्र ठरेल तो चौथ्या स्थानावर असेल.

MI vs RCB IPL 2023
IPL 2023 RCB vs GT : बंगळूरला प्ले-ऑफची अधिक संधी! गुजरात प्रमुख खेळाडूंना विश्रांती?

चेन्नई आणि लखनौ व्यतिरिक्त गुजरात टायटन्सनेही प्लेऑफसाठी पात्र झाला आहे. त्याचबरोबर कोलकाता नाईट रायडर्स, पंजाब किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ बाहेर पडले आहेत. मुंबई आणि बंगळुरूला प्लेऑफसाठी पात्र होण्यासाठी काय आवश्यक आहे ते जाणून घेऊया…

त्याआधी पॉइंट टेबलवर एक नजर टाकूया... गुजरातचा संघ पहिल्या स्थानावर राहून प्लेऑफ खेळेल, तर चेन्नईचे दुसरे आणि लखनौचे तिसरे स्थान निश्चित झाले आहे. चौथ्या स्थानासाठी मुंबई, बेंगळुरू आणि राजस्थान यांच्यात लढत आहे. म्हणजेच क्वालिफायर-1 गुजरात विरुद्ध चेन्नई चेपॉकमध्ये खेळला जाईल. त्याच वेळी एलिमिनेटर लखनौ आणि चेपॉकमध्ये चौथा संघ यांच्यात खेळला जाईल.

MI vs RCB IPL 2023
MI vs SRH : आयपीएलमधील भवितव्याचा आज फैसला! मुंबई संघ तळ्यात की मळ्यात?

राजस्थानने साखळी फेरीतील त्यांचे सर्व सामने खेळले आहेत. त्याचे 14 सामन्यांत सात विजय आणि सात पराभवांसह 14 गुण आहेत. संघाचा नेट रन रेट +0.148 आहे. राजस्थानला प्लेऑफमध्ये पोहोचायचे असेल, तर मुंबई आणि बंगळुरू या दोन्ही संघांना आपापले सामने हरावे लागतील.

यासोबतच बेंगळुरूचा पाच किंवा त्याहून अधिक धावांच्या फरकाने पराभव आणि गुजरातला 19.3 षटकांपूर्वी लक्ष्य गाठावे लागेल. यासह बेंगळुरूचा नेट रन रेट राजस्थानपेक्षा वाईट होईल आणि संजू सॅमसनचा संघ 14 गुणांसह प्लेऑफमध्ये पोहोचेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com