Shardul Thakur : लॉर्ड शार्दुलची घरवापसी! केकेआरनंतर पुन्हा धोनीच्या कळपात सामील

shardul thakur
shardul thakur esakal

Shardul Thakur : दुबईत सुरू असलेल्या आयपीएल 2024 च्या लिलावात वेगवान गोलंदाज आणि थोडीफार फलंदाजी करू शकणाऱ्या खेळाडूंची चलती आहे. यंदाच्या मिनी लिलावात सर्वात जास्त बोली ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सवर लागली. त्याला चब्बल 20.50 कोटी रूपये देऊन हैदराबादने आपल्या गोटात सामील करून घेतली. सुरूवातीला चेन्नईने देखील कमिन्समध्ये रस दाखवला होता.

दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जने आपला जुना खेळाडू शार्दुल ठाकूरला पुन्हा आपल्या कळपात समील करून घेतलं. शार्दुल ठाकूरची मोक्याच्या क्षणी विकेट घेण्याची आणि संघाला गरज असताना फलंदाजीतही योगदान देण्याची क्षमता सर्वांना माहिती आहे.

shardul thakur
Pat Cummins : 20.50 कोटी...! पॅट कमिन्सवर हैदराबादनं जीव ओवाळून टाकला; ठरला इतिहासातील महागडा पहिला खेळाडू
shardul thakur
IPL 2024 Auction Live : कमिन्सने तोडले आयपीएलचे सर्व रेकॉर्ड! मिशेल ठरला दुसरा सर्वात महागडा किवी खेळाडू

शार्दुल ठाकूर चेन्नईत दाखल झाल्यानंतर चेन्नईची बॅटिंग डेप्थ वाढली असून होम ग्राऊंडवर शार्दुल प्रभावी ठरू शकतो.

चेन्नई सुपर किंग्जने शार्दुल सोबतच यंदाच्या वनडे वर्ल्डकपमध्ये दमदार करणाऱ्या दोन न्यूझीडलंच्या खेळाडूंना देखील आपल्या गळाला लावलं. त्यांनी रचिन रविंद्रला 1.8 कोटी रूपयाला खरेदी केलं.

तर चेन्नई सुपर किंग्जने डॅलेम मिचेलला 14 कोटी रूपयाला खरेदी केलं. मिचेल हा न्यूझीलंडचा मॅच विनर खेळाडू म्हणून प्रसिद्ध आहे. त्याने वनडे वर्ल्डकपच्या सेमी फायनल सामन्यात भारताविरूद्ध 119 चेंडूत 134 धावांची खेळी केली होती.

shardul thakur
IPL Auction Expensive Players : पॅट कमिन्स ठरला आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू; एका क्लिकवर संपूर्ण लिस्ट

चेन्नई सुपर किंग्जचा मुख्य प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग रचिन रविंद्र आणि डॅरेल मिचेल यांच्याबाबत बोलताना म्हणाला की, 'रचिन रविंद्र हा इतक्या कमी किंमतीत मिळाला हा आमच्यासाठी बोनसच आहे. आमचं मुख्य लक्ष हे डॅरेल मिचेल होतं. ही आमची यंदाच्या लिलावातील मुख्य बोली होती.
(Sports Latest News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com