IPL 2024 Schedule : BCCI ची घोषणा अन् चाहत्यांचा आनंद गगनाला भिडला! १२ वर्षांनंतर चेन्नईमध्ये रंगणार IPL फायनलचा थरार

IPL 2024 BCCI announces full schedule Final in Chennai : आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील उर्वरित वेळापत्रकाची घोषणा सोमवारी बीसीसीआयकडून करण्यात आली.
IPL 2024 Schedule : BCCI ची घोषणा अन् चाहत्यांचा आनंद गगनाला भिडला! १२ वर्षांनंतर चेन्नईमध्ये रंगणार IPL फायनलचा थरार

IPL 2024 BCCI announces full schedule Final : आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील उर्वरित वेळापत्रकाची घोषणा सोमवारी बीसीसीआयकडून करण्यात आली. चेन्नईमध्ये अजिंक्यपदाचा फैसला होणार असून २६ मे रोजी आयपीएलला विजेता लाभणार आहे. तब्बल १२ वर्षांनंतर चेन्नईमध्ये जेतेपदाची लढत रंगणार आहे. याआधी २०१२मध्ये चेन्नईमध्ये आयपीएलचा अंतिम सामना खेळवण्यात आला होता. कोलकाता नाईट रायडर्सने यजमान चेन्नई सुपरकिंग्सला पराभूत करून पहिल्यांदाच ही स्पर्धा जिंकण्याची किमया करून दाखवली होती.

IPL 2024 Schedule : BCCI ची घोषणा अन् चाहत्यांचा आनंद गगनाला भिडला! १२ वर्षांनंतर चेन्नईमध्ये रंगणार IPL फायनलचा थरार
CSK Schedule IPL 2024 : MS धोनी 'या' मैदानावर दिसणार शेवटचा खेळताना? जाणून घ्या CSK संघाचे संपूर्ण शेड्युल

आयपीएलच्या यंदाच्या प्ले ऑफच्या लढती चेन्नई व अहमदाबाद या दोन ठिकाणी आयोजित करण्यात आल्या आहेत. साखळी फेरीनंतर अव्वल दोन संघांमध्ये होणारी क्वॉलिफायर वन ही लढत अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगणार असून त्यानंतर तिसऱ्या व चौथ्या स्थानावरील एलिमिनेटर ही लढतही त्याच स्टेडियमवर २२ मे रोजी पार पडणार आहे. गतविजेता चेन्नई सुपरकिंग्सच्या घरच्या मैदानावर अंतिम सामन्यासोबतच क्वॉलिफायर टू ही लढतीचा थरारही क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळणार आहे.

IPL 2024 Schedule : BCCI ची घोषणा अन् चाहत्यांचा आनंद गगनाला भिडला! १२ वर्षांनंतर चेन्नईमध्ये रंगणार IPL फायनलचा थरार
ऑस्ट्रेलियाची घोषणा! 1991-92 नंतर पहिल्यांदाच घडणार... IND vs AUS कसोटी मालिकेसाठी घेतला मोठा निर्णय

भारतात या वर्षी लोकसभा निवडणूक होणार आहे. याकडे लक्ष देऊन बीसीसीआयने २२ मार्च ते ७ एप्रिल या दरम्यानच्या २१ लढतींच्या वेळापत्रकाची घोषणा आधी केली होती. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर उर्वरित मोसमाचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार होते. काही दिवसांपूर्वीच लोकसभा निवडणुकांच्या तारखा निश्‍चित झाल्या. भारतामध्ये १९ एप्रिल ते १ जून या कालावधीत लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीनुसार बीसीसीआयकडून आयपीएलचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.

IPL 2024 Schedule : BCCI ची घोषणा अन् चाहत्यांचा आनंद गगनाला भिडला! १२ वर्षांनंतर चेन्नईमध्ये रंगणार IPL फायनलचा थरार
MI vs CSK IPL 2024 : ठरलं तर मग... एकच होणार एल क्लासिको! पांड्याच्या होम ग्राऊंडवर ऋतुराजची CSK 'या' तारखेला देणार MI ला टक्कर

संध्याकाळच्या लढती ७.३० वाजता

आयपीएलच्या यंदाच्या संध्याकाळच्या लढती ७.३० वाजता सुरू होणार आहेत. साखळी फेरी ते प्ले ऑफ या सर्व लढती ७.३० वाजताच सुरू होतील. अंतिम फेरीच्या सामन्याच्या वेळेतही कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

दृष्टिक्षेपात

  • - २६ मे रोजी चेन्नईत अंतिम सामना, क्वॉलिफायर-२ लढतही तेथेच

  • - क्वॉलिफायर-१ व एलिमिनेटर लढत अहमदाबादमध्ये

  • - दिल्ली कॅपिटल्स घरच्या मैदानावर २० एप्रिलपासून खेळणार (सलग पाच लढतींचे तेथे आयोजन)

  • - पंजाब किंग्सचा संघ यंदा मुल्लानपूर येथील नव्या स्टेडियममध्ये पहिल्यांदाच खेळणार

  • - राजस्थान रॉयल्सचा संघ जयपूरसह गुवाहाटी येथेही घरचे सामने खेळणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com