Rohit Sharma: रोहितच्या 'त्या' गंभीर आरोपावर स्टार स्पोर्ट्सचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'क्लिपमध्ये फक्त...'

Star Sports: रोहित शर्माने गोपनीयतेचे उल्लंघन केल्याचा आरोप स्टार स्पोर्ट्सवर केला होता. त्यानंतर आता वाहिनीकडून उत्तर देण्यात आले आहे.
Rohit Sharma | Mumbai Indians
Rohit Sharma | Mumbai IndiansSakal

Star Sports on Rohit Sharma's allegation: मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माने रविवारी (19 मे) सोशल मीडियावर पोस्ट करत आयपीएल सामन्यांचे प्रक्षेपण करणाऱ्या वाहिनीवर खळबळजनक आरोप केले होते. त्याने स्टार स्पोर्ट्सवर खेळाडूंच्या गोपनीयतेचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता.

आयपीएल 2024 दरम्यान रोहित काही माजी खेळाडूंशी चर्चा करत असतानाचे त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर त्याने पोस्ट करत स्टार स्पोर्ट्सवर टीका केली होती.

त्यांनंतर आता स्टार स्पोर्ट्सने यावर मौन सोडले असून त्यांनी रोहितच्या आरोपांना फेटाळले आहे.

Rohit Sharma | Mumbai Indians
Virat Kohli Insta Post Value: 'मी एवढे पैसे घेत नाही, माझ्याविषयी खोट्या...' इंस्टाग्रामच्या कमाईवर विराट कोहलीने सोडले मौन

स्टार स्पोर्ट्सने म्हटले आहे की 'वानखेडे स्टेडियमवर १६ मे रोजी संघाच्या सराव सत्रावेळी जी क्लिप घेण्यात आलेली, ज्यासाठी स्टार स्पोर्ट्सकडे अधिकृत परवानगी होती. या क्लिपमध्ये सिनियर खेळाडू त्याच्या मित्रांबरोबर मैदानाच्या बाजूला संवाद साधताना दिसत आहे. त्यांच्या संवादाचा आवाज रेकॉर्ड करण्यात आला नव्हता आणि प्रसारितही करण्यात आला नव्हता.'

'क्लिपमध्ये केवळ सिनियर खेळाडू त्याचा आवाज रेकॉर्ड न करण्यासाठी विनंती करत असल्याचे दाखवण्यात आले, ती क्लिप स्टार स्पोर्ट्सच्या सामन्यापूर्वीच्या तयारीच्या लाईव्ह कव्हरेजमध्ये दाखवण्यात आली होती आणि त्यात संपादकीय प्रासंगिकतेचा अभाव होता.'

रोहितने काय केलेला आरोप?

रोहितने ट्वीट केले होते की 'क्रिकेटपटू सराव किंवा सामन्यावेळी सहकारी आणि मित्रांशी संवाद साधत असताना आमच्या संभाषणाचा आणि प्रत्येक क्षणही कॅमेऱ्यात कैद केला जात आहे.'

'माझा संवाद रेकॉर्ड करू नका, असे स्टार स्पोर्ट्सला सांगण्यात आल्यानंतरही त्या संवादाचे प्रसारण करण्यात आले. हे गोपनीयतेचे हे उल्लंघन आहे. त्यांना काहीतरी एक्स्क्लिझिव्ह हवे म्हणून आणि फक्त अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचायचे आहे. यामुळे एकदिवस चाहते, क्रिकेटपटू आणि क्रिकेट यांच्यामधील असलेला विश्वास संपून जाईल.'

Rohit Sharma | Mumbai Indians
RCB vs CSK: चेन्नईला पराभूत झालेलं पाहताच दिग्गज क्रिकेटरचे पाणावले डोळे, Video होतोय व्हायरल

नक्की काय झालेलं?

आयपीएल 2024 दरम्यान 11 मे रोजी मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघात ईडन गार्डन्सला सामना झालेला. या सामन्यावेळी रोहित कोलकाताचा प्रशिक्षक आणि त्याचा मित्र असलेल्या अभिषेक नायरशी बोलताना दिसला होता.

त्याच्यातील संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यांच्यातील संभाषणावेळी रोहित 'येथे प्रत्येक गोष्ट बदलत आहे. पण हे माझे घर आहे. मंदिर आहे, जे मी बनवले आहे. हे माझे शेवटचे आहे.' असं काहीसं बोलताना ऐकू येत होतं. त्यानंतर त्याच्या या व्हिडिओची बरीच चर्चा झाली होती.

यानंतर लखनौ सुपर जायंट्स् विरूद्धच्या सामन्यापूर्वी रोहितची भेट धवल कुलकर्णीशी झाली होती. त्यावेळी रोहितने हात जोडून आवाज रेकॉर्ड न करण्याची विनंती केली होती.

खरंतर रोहितला आयपीएल 2024 आधी मुंबई इंडियन्सने कर्णधारपदावरून हटवत ही जबाबदारी हार्दिक पांड्याकडे सोपवली होती. तेव्हापासून रोहित पुढीलवर्षी मुंबई संघातून बाहेर पडेल, अशी चर्चा होती. आता या प्रकरणाला काय वळण मिळणार, हे पाहावे लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com