IPL 2024 Schedule : लोकसभा निवडणूक तरी आयपीएल 2024 भारतातच होणार?

IPL 2024 Schedule
IPL 2024 Scheduleesakal
Updated on

IPL 2024 Schedule : भारतात सध्या लोकसभा 2024 च्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. त्याचदरम्यान भारतात जगातील सर्वात मोठी स्पर्धा आयपीएल होत असते. निवडणुकांमुळे यंदाची आयपीएल विदेशात हलवावी लागेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र बीसीसीआय आयपीएलचा संपूर्ण हंगाम भारतात खेळवण्यासाठी उत्सुक आहे. त्या दृष्टीनेच तयार सुरू असल्याचे बीसीसीआय सूत्रांनी सांगितले असून आयपीएल भारतातच होणार यावर जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे.

IPL 2024 Schedule
Wasim Akarm : पत्नीला हॉट म्हणणाऱ्या चाहत्यावर वसिम अक्रम जाम भडकला; म्हणाला...

जगातील सर्वात मोठी टी 20 लीग ही यंदा 22 मार्चपासून सुरू होण्याची शक्यता आहे. आयपीएलची अधिकृत तारीख ही लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर घोषित करण्यात येईल. बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की बीसीसीआयने आयपीएलचा हंगाम हा भारतातच खेळवण्यावर शिक्कामोर्तब केलं आहे.

बीसीसीआय सूत्राने एएनआयला दिलेल्या माहितीनुसार 'आयपीएल देशाच्या बाहेर खेळवली जाईल अशी शक्यता नाही. लोकसभा निवडणूक आणि आयपीएल हंगाम एकाचवेळी होत आहे. त्यावेळी जे कोणतं राज्य योग्य कारणामुळे आयपीएल सामना आयोजित करण्यास उत्सुक नसेल तर तो सामना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात येईल.'

IPL 2024 Schedule
Ind Vs Afg T20 : अफगाणिस्तानला मोठा धक्का! रशीद खान दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेतून बाहेर

यंदाच्या आयपीएल हंगामाचा लिलाव हा दुबईत झाला होता. इतिहासात पहिल्यांदाच आयपीएलचा लिलाव हा भारताबाहेर झाला होता. या लिलावात सर्वाधिक बोली लागण्याचा विक्रम दोनवेळा मोडला. ऑस्ट्रेलियाचा स्टार वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क हा इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. केकेआरने त्याला 24.75 कोटी रूपयांची बोली लावत आपल्याकडे खेचले.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com