PBKS vs SRH | IPL 2024
PBKS vs SRH | IPL 2024Sakal

IPL 2024, Video: तो एक सिक्स... ज्या गोलंदाजानं SRH च्या हातून घालवलेली मॅच त्याचाच शॉट ठरला 'टर्निंग पाँइंट'

IPL 2024, PBKS vs SRH: आयपीएलच्या 23 व्या सामन्यात पंजाबच्या शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा यांनी 20 व्या षटकात 26 धावा चोपत सामना खेचून आणला होता, पण हैदराबादने अखेर विजय मिळवण्यात यश मिळवले. या शेवटच्या षटकाचा पाहा रोमांच.

IPL 2024, PBKS vs SRH: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील 23 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने पंजाब किंग्सविरुद्ध 2 धावांनी रोमांचक विजय मिळवला. हा हैदराबादचा 17 व्या आयपीएल हंगामातील तिसरा विजय ठरला.

दरम्यान, या सामन्यातील शेवटचे षटक अत्यंक रोमांचक ठरले. पंजाबच्या शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा यांनी विजय खेचून आणला होता, पण हैदराबादने अखेर विजय मिळवण्यात यश मिळवले.

या सामन्यात हैदराबादने पंजाबसमोर 183 धावांचे आव्हान ठेवले होते. हैदराबादकडून 20 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर जयदेव उनाडकटने षटकात ठोकला होता, त्यामुळे हैदराबादला 20 षटकात 9 बाद 182 धावांपर्यंत पोहचला आले होते. त्याचा हाच एक षटकार हैदराबादसाठी महत्त्वाचा ठरला.

कारण त्यानेच नंतर पंजाबच्या डावातील 20 व्या षटकातही गोलंदाजी केली आणि विशेष म्हणजे या षटकात पंजाबला विजयासाठी 29 धावांची गरत असताना त्याने तब्बल 26 धावा दिल्या. त्याचमुळे त्याने फलंदाजी करताना शेवटच्या चेंडूवर मारलेला षटकार महत्त्वाचा ठरला.

PBKS vs SRH | IPL 2024
Ruturaj Gaikwad: 'टॉसला जातो, तेव्हा माही भाईप्रमाणेच...', अखेर ऋतुराजच्या CSK कॅप्टन्सीबद्दल मनातल्या भावना ओठांवर

रोमांचक ठरले शेवटचे षटक

या सामन्यात पंजाबला शेवटच्या षटकात 29 धावांची गरज असताना शशांक सिंग आणि आशुतोष सिंग फलंदाजी करत होते, तर उनाडकट गोलंदाजी केली.

या षटकातील पहिला चेंडू उनाडकटने धीम्यागतीने आखुड टप्प्याचा टाकला. पण त्यावर आशुतोषने मिडओव्हरच्या वरून षटकार ठोकला. त्यानंतरचे दोन चेंडू उनाडकटने वाईड टाकले. तसेच दुसरा अधिकृत चेंडूवरही आशुतोषने त्याला षटकार ठोकला. त्यामुळे पहिल्या दोन चेंडूतच 14 धावा निघाल्या होत्या.

त्यानंतर हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने उनाडकटबरोबर चर्चा केली. यानंतचा दोन चेंडूवर शशांक आणि आशुतोष यांनी दुहेरी धावा धावत एकूण 4 धावा जमवल्या. त्यामुळे अखेरच्या दोन षटकात पंजाबला 11 धावा हव्या होत्या. यावेळी पुन्हा एकदा उनाडकटने वाईड चेंडू टाकला.

त्यानंतरच्या अधिकृत पाचव्या चेंडूवर आशुतोषला एकच धाव करता आली. तसेच अखेरच्या चेंडूवर शशांकने षटकार मारला, परंतु त्यांना विजयासाठी 3 धावा कमी पडल्या. त्यामुळे हैदराबादने विजयावर शिक्कामोर्तब केले.

PBKS vs SRH | IPL 2024
Hardik Pandya: आधी शंकरभक्ती अन् आता कृष्णाच्या चरणी! हार्दिक पांड्याचा Video व्हायरल

या सामन्यात शशांक 25 चेंडूत 46 धावांवर नाबाद राहिला, तर आशुतोष 15 चेंडूत 33 धावा करून नाबाद राहिला.

हैदराबादकडून गोलंदाजीत भुवनेश्वर कुमारने 2 विकेट्स घेतल्या, तर कमिन्स, टी नटराजन, नितीश रेड्डी आणि उनाडकट यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पुर्वी हैदराबादकडून फलंदाजी करताना नितीश रेड्डीने सर्वाधिक 64 धावांची खेळी केली, तर अब्दुल सामदने 25 धावांची खेळी केली, तर ट्रेविस हेडने 21 धावा केल्या. यांच्याशिवाय कोणालाही 20 धावांचा टप्पा पार करता आला नाही.

पंजाबकडून गोलंदाजी करताना अर्शदीप सिंगने 4 विकेट्स घेतल्या, तर सॅम करन आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या, तर कागिसो रबाडाने 1 विकेट घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com