Sanjiv Goenka-KL Rahul
Sanjiv Goenka-KL RahulSakal

SRH vs LSG: लखनौचा लाजीरवाणा पराभव अन् संघमालकांनी राहुलला झाप-झाप झापलं; सोशल मीडियावर नुसता मीम्सचा पाऊस

Sanjiv Goenka: सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या लाजीरवाण्या पराभवानंतर लखनौ सुपर जायंट्सचे संघमालक संजीव गोयंका कर्णधार केएल राहुलवर चिडल्याचे दिसले होते, त्यानंतर सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल झाले आहेत.

Sanjiv Goenka-KL Rahul: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील 57 व्या सामन्यात बुधवारी सनरायझर्स हैदराबादने लखनौ सुपर जायंट्सला मोठा पराभवाचा धक्का दिला. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने तब्बल 10 विकेट्सने विजय मिळवला.

या सामन्यात लखनौने 166 धावांचे आव्हान हैदराबादसमोर ठेवले होते. पण हे आव्हान हैदराबादचे सलामीवीर ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा या सलामीवीरांनी 9.4 षटकातच पूर्ण केले आणि हैदराबादला विजय मिळवून दिला.

Sanjiv Goenka-KL Rahul
IPL 2024: 'रोहित पुढच्या वर्षी मुंबई इंडियन्स सोडेल...', वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी; कोणत्या संघाकडून खेळावं हेही सांगितलं

दरम्यान, या लाजीरवाण्या पराभवानंतर मात्र लखनौचे संघमालक संजीव गोयंका कर्णधार केएल राहुलबरोबर रागात बोलताना दिसले होते. त्यांच्या चर्चेदरम्यानचा जो व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्यावरून तरी ते त्याला पराभवाबद्दल जाब विचारत असल्याचा कयास लावण्यात येत आहे.

याबाबत सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटल्या आहेत. तसेच मीम्सही व्हायरल झाल्या आहेत. यातील काही मीम्स गमतीशीर आहेत, तर काही युजर्सने संजीव गोयंकांवर टीका केली आहे. काही युजर्सने सामन्यात जे काही झालं, त्याची मजा घेणारे मीम्स शेअर केले आहेत.

Sanjiv Goenka-KL Rahul
GT vs CSK : गुजरात करो या मरो स्थितीत; सीएसके प्ले ऑफच्या शर्यतीत सेफ होण्यासाठी जोर लावणार

या सामन्यात लखनौने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, लखनौला प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 बाद 165 धावा केल्या होत्या.

सुरुवातीला लवकर विकेट्स गमावल्यानंतर लखनौकडून आयुष बडोनी आणि निकोलस पूरन यांनी नाबाद 99 धावांची भागीदारी करत संघाला 165 धावांपर्यंत पोहचवले होते. बडोनीने 30 चेंडूत 55 धावांची नाबाद खेळी केली.

तसेच निकोलस पूरनने 26 चेंडूत नाबाद 48 धावांची खेळी केली. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमारने 2 विकेट्स घेतल्या, तर कमिन्सने 1 विकेट घेतली.

त्यानंतर 166 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादकडून ट्रेविस हेडने 30 चेंडूत 8 चौकार आणि 8 षटकारांसह नाबाद 89 धावा केल्या, तसेच अभिषेक शर्माने 28 चेंडूत 8 चौकार आणि 6 षटकारांसह 75 धावांची खेळी केली. त्यामुळे हैदराबादने हा सामना सहज जिंकला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com