IPL 2025 Top 2 qualification scenario for Mumbai Indians : १६ एप्रिलला मुंबई इंडियन्सचा संघ ५ सामन्यांत केवळ १ विजय मिळवून गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर होता आणि दिल्ली कॅपिटल्सचा संघ ४ पैकी चार सामने जिंकून टेबल टॉपर होता. पण, आज इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या प्ले ऑफच्या शर्यतीत मुंबई इंडियन्सने बाजी मारली अन् दिल्ली कॅपिटल्सचा संघ बाहेर फेकला गेला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या लढतीत मुंबईने १८० धावांचा डोंगर उभा केला आणि त्यानंतर दिल्लीला १२१ धावांवर गुंडाळून प्ले ऑफचे चौथे स्थान निश्चित केले.