Ruturaj Gaikwad’s captaincy decision : चेन्नई सुपर किंग्सचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी ऋतुराज गायकवाडला कर्णधार करण्याचा निर्णय हा महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) व स्टीफन फ्लेमिंग यांचा होता आणि याबाबत संघ व्यवस्थापनाला काहीच कल्पना नव्हती, असे धक्कादायक विधान केले आहे. महेंद्रसिंग धोनीने अचानक कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आणि ऋतुराजकडे ही जबाबदारी सोपवली होती. ऋतुराजनेही या नव्या भूमिकेला आतापर्यंत योग्य न्याय दिला आहे.