Chennai Super Kings vs Delhi Capitals Marathi Update: लोकेश राहुलने चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला. फॅफ ड्यू प्लेसिस अनुपस्थितीत असल्याने लोकेशला सलामीला खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने पहिल्या षटकापासून ते शेवटच्या षटकापर्यंत फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सला मोठी धावसंख्या उभारून दिली. दरम्यान, २०व्या षटकात रवींद्र जडेजा व महेंद्रसिंग धोनी या जोडीने केलेला रन आऊट पाहून तरुणी खूपच आनंदीत झाली आणि तीचा व्हिडीओ व्हायरल झाला.