
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स फलंदाजीत सुरुवातीपासूनच संघर्ष करताना दिसले आहे. त्यांच्या संघाकडून आक्रमक खेळ अद्यापही पाहायला मिळालेला नाही. हीच गोष्ट शुक्रवारी (२५ एप्रिल) सनरायझर्स हैदराबाद विरूद्धच्या सामन्यातही दिसली.
चेपॉकवर होत असलेल्या या सामन्यात चेन्नईचा संघ २० षटके पूर्ण होण्यापूर्वीच सर्वबाद झाला. चेन्नईने हैदराबादसमोर विजयासाठी १५५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. हा सामना स्पर्धेतील आव्हान राखण्यासाठी दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे.
दरम्यान, या सामन्याच्या पहिल्या डावात तरी हैदराबादच्या गोलंदाजांनी वर्चस्व ठेवल्याचे दिसले, त्यामुळे संघमालकीण काव्या मारन खूश दिसत होती.