Dewald Bravis | Kamindu Mendis  | CSK vs SRH | IPL 2025Sakal
IPL
CSK vs SRH: ६,६,६... डेवाल्ड ब्रेव्हिसने ज्याला एकाच षटकात तीन सिक्स मारले, त्यानेच पकडला IPL 2025 मधील सर्वोत्तम कॅच; VIDEO
Dewald Brevis Catch: डेवाल्ड ब्रेव्हिसने आज चेन्नई सुपर किंग्सकडून सनरायझर्स हैदराबादविरुद्ध पदार्पण केले. त्याने पदार्पणातच त्याची प्रतिभा दाखवली. पण त्याची विकेट एका अफलातून कॅचमुळे गेली. 
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत ४३ वा सामना शुक्रवारी (२५ एप्रिल) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात चेपॉकवर खेळवला जात आहे. या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
दोन्ही संघांना स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी या सामन्यात विजय मिळवावाच लागणार आहे. या सामन्यातून चेन्नईकडून युवा खेळाडू डेवाल्ड ब्रेव्हिसनेही पदार्पण केले आहे. त्याने पदार्पणात त्याच्यातील प्रतिभेची चुणूकही दाखवली.

