
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत शुक्रवारी (२५ एप्रिल) ४३ वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात खेळवला जात आहे. हा सामना चेन्नईच्या घरच्या मैदानात एमए चिदंबरम स्टेडियम (चेपॉक) येथे खेळवला जात आहे.
दोन्ही संघ सध्या पाँइंट्स टेबलमध्ये सर्वात तळात आहेत. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा सामना असून पुढे जाण्यासाठी या सामन्यात विजय मिळवावाच लागणार आहे. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.