
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेचा शेवट चेन्नई सुपर किंग्सने रविवारी (२५ मे) गुजरात टायटन्सला अहमदाबादमध्ये ८३ धावांनी पराभूत करत गोड केला. चेन्नईचे आव्हान यापूर्वीच संपले असल्याने त्यांचा हा अखेरचा सामना होता.
मात्र या पराभवामुळे जरी गुजरात अव्वल क्रमांकावर कायम असले, तरी त्यांचे गणित बिघडले आहे. त्यांना हा अव्वल क्रमांक टिकवणे त्यांच्या हातात नसेल. गुजरातचा हा प्लेऑफपूर्वीचा अखेरचा साखळी सामना होता.
या सामन्यात चेन्नईने गुजरातसमोर २३१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातला १८.३ षटकात सर्वबाद १४७ धावाच करता आल्या. चेन्नईकडून गोलंदाजीत चांगली सांघित कामगिरी पहायला मिळाली.