
Delhi Capitals vs Kolkata Knight Riders Marathi Update: कोलकाता नाइट रायडर्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये आज दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध चांगली फलंदाजी केली. २३ कोटींचा वेंकटेश अय्यर आजही अपयशी ठरला, अजिंक्य रहाणेने पुन्हा जबाबदारी उचलत चांगली फटकेबाजी केली. दोन्ही सलामीवीरही मजबूत पाया रचून गेले, परंतु पॉवर प्लेनंतर दिल्लीने पुनरागमन करताना धक्के दिले. तरीही कोलकाताच्या फलंदाजांनी १०ची सरासरी कायम राखली.