
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेतील चौथा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स संघात सोमवारी खेळवला जात आहे. दिल्लीने घरचे मैदान म्हणून स्वीकारलेल्या डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम, विशाखापट्टणम येथे हा सामना होत आहे.
दरम्यान, या सामन्यात लखनौचे नेतृत्व रिषभ पंत करणार आहे, तर दिल्लीचे नेतृत्व अक्षर पटेल करणार आहे. त्यामुळे जुन्या संघाविरुद्ध आता रिषभ कशी कामगिरी करणार याकडेही या सामन्यावेळी सर्वांचे लक्ष्य असणार आहे.