
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत रविवारी (२७ एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात ४६ वा सामना झाला. अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात बंगळुरूने ६ विकेट्सने विजय मिळवला.
बंगळुरूचा हा १० सामन्यातील ७ वा विजय होता. त्यामुळे यंदाच्या हंगामात ७ विजय मिळवणारा बंगळुरू पहिला संघ ठरला. त्यांचे आता १४ गुण झाले असून ते पाँइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानावरून थेट पहिल्या क्रमांकावर आले आहेत. त्यांनी गुजरात टायटन्स, मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स या तिन्ही संघांना मागे टाकले आहेत. या तिन्ही संघांचे १२ गुण आहेत.